१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर माऊली वारकरी कन्या आश्रमात बलात्कार
कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात या महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल
माऊली वारकरी कन्या आश्रमात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार
-कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात या महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल
कन्नड : बदलापूर येथील प्रकरणाने संतापाची लाट उसळली असतानाच आता कन्नड तालुक्यातील हतनूर येथील माऊली वारकरी कन्या आश्रमात दादा महाराज अकोलकर या ६० वर्षीय संस्थाचालक बाबाने आपल्याच आश्रमात शिक्षण घेणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्याथीर्नीवर बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे. तसेच दुसऱ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिच्यावर देखील बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार रोजी उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात या महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांकडुन त्याला अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील हतनूर येथे जैतापूर रोडवर दादा महाराज अकोलकर वय ६० वर्ष यांचा माऊली वारकरी कन्या शिक्षण संस्थांचा आश्रम असून येथे असलेल्या मुली या वेगवेगळ्या ठिकाणच्या १५ मुली बाहेर शालेय शिक्षण घेऊन येथे वारकरी शिक्षण घेतात. याच ठिकाणी राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय जैतापूर इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेणारी १३ वर्षीय विद्यार्थिनी आश्रमात वारकरी शिक्षण घेत आहेत.
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर माऊली वारकरी कन्या आश्रमात बलात्कार:
या घटनेतील सदर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, आम्ही दादा महाराज अकोलकर यांचे माऊली वारकरी कन्या आश्रम येथे राहते. आश्रमातुन आम्ही सर्व मुली शाळेच्या कुझर गाडीने शाळेत ये-जा करतो शाळेची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी चार पर्यंत असते. माझ्यासोबत कन्या आश्रम मध्ये इ. १ ली ते १५ वी पर्यंतच्या १५ मुली शिक्षण घेत आहेत. त्यासुध्दा माझ्याच शाळेत शिकतात. आमच्या कन्या शाळा आश्रमाचे सगळे काम दादा महाराज अकोलकर पाहत असून आम्ही सर्व मुली त्यांना बाब म्हणतो. आश्रमात आम्ही रोज पहाटे पाच वाजता उठतो. त्यानंतर अंघोळ करुन पुजा करुन गितापाठ करतो, शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता बाबा आम्हा सर्व मुलींचे हरिपाठ करायला लावायचे त्यांनंतर आम्ही मुली स्वयंपाक करुन जेवण करुन रात्री साईनऊ दहा वाजता झोपायचो. या आधीपण माझ्याकडुन मी आश्रमात गेल्यापासुन दररोज रात्री जेवण झाल्यावर झोपण्याआधी बाबांनी माझ्याकडून हातपाय दाबून घेत होते.
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर माऊली वारकरी कन्या आश्रमात बलात्कार:
यानंतर २० ऑगस्ट मंगळवार रोजी रात्री साडेनऊ दहा वाजता आश्रमातील शेडमध्ये आम्ही सर्व मुली झोपलेल्या असतांना रात्रीच्या बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास दादा महाराज अकोलकर हे माझ्याजवळ आले त्यांनी मला हात लावुन हलवुन उठवले आणि माझे पाय दावायला चल असे म्हणून मला झोपेतून उठवून आम्ही मुली झोपत असलेल्या शेडला लागुन असलेल्या बाबांच्या शेडमध्ये घेवुन गेले, ते पलंगावर झोपले त्यांनी मला त्यांचे पाय दाबायला लावले. मी त्यांचे पलंगावर बसून त्यांचे पाय दाबत असतांना त्यांनी बळजबरीकरून बलात्कार केला. व नंतर जाऊन झोपून रहा कोणाला सांगू नको नाहीतर मी तुला शिकवणार नाही अशी धमकी दिली, असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.