मुक्तिसंग्राम दिनाच्या घेण्यात येणाऱ्या मराठवाडा बैठकीसाठी फक्त १५ दिवस

-मंत्रिमंडळ बैठकीचा कुठलाही निरोप मिळाला नाही : प्रशासन

0

मुक्तिसंग्राम दिनाच्या घेण्यात येणाऱ्या मराठवाडा बैठकीसाठी फक्त १५ दिवस

-मंत्रिमंडळ बैठकीचा कुठलाही निरोप मिळाला नाही : प्रशासन

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि संभाजीनगरचे प्रश्न सुटावेत म्हणून वर्षात मंत्रिमंडळाची एक बैठक शहरात घेण्याची परंपरा आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याच्या मागण्यांची चर्चा मंत्रिमंडळापर्यंत पोहोचावी, हा या बैठकीमागचा मुख्य उद्देश असतो. मात्र हैदराबाद मुक्तिदिन केवळ १५ दिवसांवर असताना अजुनपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीचा कुठलाही निरोप मिळाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

मागील वर्षी १६ सप्टेंबर रोजी शहरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्या वेळी विकासासाठी ५९ हजार कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली होती. यामध्ये नवीन योजना, जुन्या योजनांसाठी लागणारा निधी, चालू योजनांचा निधी आदींचा समावेश होता. यामधील किती निधी आला, यासंदर्भातील बैठक तब्बल वर्षभरानंतर घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये कोणत्या विभागाला किती निधी मिळाला आणि तो किती खर्च झाला याची नोंद घेतली जात आहे.

तहान लागला की विहीर खोदण्याचे काम प्रशासनाने सुरू केल्याची चर्चा आहे. यामध्ये विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी बुधवारी बैठक घेऊन कोणते शासन निर्णय निघाले याबाबत माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बैठकीची परंपरा सुरू केली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही बैठक मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने व्हावी यासाठी पुढाकार घेतला.

यावेळी विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणाले की, हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या अनुषंगाने झालेल्या घोषणा आणि निर्णयाबाबत आम्ही माहिती घेतली आहे. कोणत्या विभागाला किती निधी मिळाला याबाबत परिपुर्ण माहिती उपलब्ध नाही. या वर्षीच्या मंत्रिमंडळ बैठकीबाबत अद्याप कोणतीही सूचना प्राप्त नाही. तर मागील २० वर्षांत मराठवाड्यात १० हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. सरकार संवेदनशील आहे, हे दाखवण्यासाठी ही बैठक घेतली जाते. येथील लोकप्रतिनिधी जागरूक नाहीत. घोषणांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन मराठवाड्याचा विकास करून घेणे अपेक्षित आहे, असे अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा म्हणाले आहेत.

बैठकीची कोणतीही सूचना नाही

मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी घेण्यात येणाºया बैठकीसाठी आता फक्त १५ दिवस उरले असून प्रशासनाला अद्याप मंत्रिमंडळ बैठकीची कोणतीही सूचना देण्यात आलेली नसल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.