रेल्वेच्या धडकेने मेंढपाळासह २२ मेंढ्यांचा मृत्यू
परळी : शहरापासून जवळ असलेल्या मलकापूर जवळ रेल्वेखाली मेंढ्या आल्याने एका मेंढपाळासह २२ मेंढ्या आणि दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार परळीतच्या धनगर गल्लीमधील दोघे जण मेंढ्या चारण्यासाठी घेऊन जात होते. यावेळी रेल्वे पटरीवरुन जात असताना मलकापूर शिवारात समोरुन आलेल्या मालगाडीने मेंढ्या आणि दोन जनावरांना चिरडले. या धडकेने २२ मेंढ्यांसह दोन गुराचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरेंच्या ताफयावर सुपाऱ्या फेकल्या प्रकरणी गुन्हा दाखल
मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 568 मिमी पावसाची नोंद
335 शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा
रेल्वेच्या धडकेने मेंढपाळासह 22 मेंढ्या मृत्यू: यावेळी मेंढ्यांना वाचविण्यासाठी धापवळ करणाऱ्या मेंढपाळ मुंजा डोणे हा देखील जागीच ठार झाला. ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी दोन्ही बाजूने डोंगर असल्याने मेंढ्या आणि गुरांना बाजूला सरकण्यासाठी जागा न मिळाल्याचे सांगितले जात आहे.
रेल्वे इंजिनच्या धडकेने एकाचा मृत्यू
यापूर्वी जानेवारी महिन्यात बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या चिंचोली गाव परिसरात रेल्वेच्या सुरू असणाऱ्या कामासाठी इलेक्ट्रिक साहित्य मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे इंजिनच्या धडकेत वृद्ध शेतकरी जागीच ठार झाला. अहमदनगरवरून येत असलेल्या इंजिनची लाभा गवळी यांना धडक बसली. या धडकेत ते जागीच ठार झाले होते.