अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी २७५ कोटी निधीची तरतूद

अमळनेर ते एगनवाडी हा ३३.१२ किलोमीटरचा टप्प्याचे काम अंतिम टप्यात

0

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी २७५ कोटी निधीची तरतूद

-अमळनेर ते एगनवाडी हा ३३.१२ किलोमीटरचा टप्प्याचे काम अंतिम टप्यात

बीड : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात २७५ कोटी निधीची तरतूद केलेली आहे. मध्य रेल्वेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून हा मार्ग एकूण २६१.२५ किलोमीटर लांबीचा आहे. यातील नगर ते अमळनेर हा १००.१८ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला असून पुढचा अमळनेर ते एगनवाडी हा ३३.१२ किलोमीटरचा टप्प्याचे काम अंतिम टप्यात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात नगर-बीड -परळी रेल्वे मार्गासह बारामती-लोणंद (५४ कि.मी.), वर्धा- नांदेड ( बरास्ता यवतमाळ- पूसद २७० किमी ) या रेल्वे मागार्साठी देखील तरदूत केल्याने हा अर्थसंकल्प बीड, नांदेड आणि बारामतीकरांसाठी फायद्याचा ठरल्याचे बोलले जात आहे.

नगर-बीड-परळी नवीन रेल्वे मार्ग २६१.२५ किलोमीटर लांबीच्या हा प्रकल्प असून त्यापैकी नगर ते अमळनेर हा १००.१८ किलोमीटरचा भाग पूर्ण झाला आहे. त्यातील पुढचा टप्पा अमळनेर ते एगनवाडी हा ३३.१२ किलोमीटरचा असून पूर्ण होण्याच्या बेतात आहे. मध्य रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या क्षेत्रातील हा सर्वात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. नगर ते वडवणी हा २००.१५ किलोमीटरचा संपूर्ण टप्पा २०२४-२५ पर्यंत तयार होणे अपेक्षित आहे, तर वडवणी ते परळीपर्यंतचा ६१.१० किलोमीटरचा उर्वरित भाग २०२५-२६ पर्यंत तयार होणे अपेक्षित आहे.या मार्गावर २३ स्थानके आहेत.

आष्टी-अमळनेर या ३४ किलोमीटरच्या टप्प्याचे उद्घाटन २५ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या नवीन मार्गावर डेमू ट्रेन सेवेच्या विस्ताराला मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. यापूर्वी अहमदनगर-आष्टी या ६६.१८ किलोमीटरच्या टप्प्याचे उद्घाटन २३ सप्टेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्त झाले होते. यावेळी डेमू ट्रेन सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. नगर-बीड-परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात ५०-५० टक्के सहभागातून सुरु आहे. या मार्गावरील ऊएटव सेवेमुळे अहमदनगर-परळी पट्ट्यातील रहिवाशांना उत्तम कनेक्टीव्हीटी मिळणार आहे.

रेल्वेमार्गावर एकूण २३ स्थानके

नगर-परळी हा रेल्वे मार्ग २६१.२५ किलोमीटर लांबीचा असुन या रेल्वेमार्गावर एकूण २३ स्थानके आहेत. अहमदनगर-नारायणडोह १२.२७ किमी २९.०३.२०१७ रोजी सुरु. नारायणडोह-सोलापूरवाड २३.२६ किमी २५.०२.२०१९ रोजी सुरु, सोलापूरवाडी-आष्टी ३१.१२.२०२१ रोजी ३०.६४ किमी. आष्टी-अमळनेर ०५.०१.२०२४ रोजी ३३.९२ किमी. याशिवाय बारामती लोणंद ( ५४ कि.मी.) वर्धा- नांदेड ( बरास्ता यवतमाळ- पूसद २७० किमी हे नवीन रेल्वेमार्गासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.