परिवर्तन आघाडीच्या नेतृत्वात २८८ उमेदवार देणार

माजी खा. राजू शेट्टी, वामनराव चटप, शंकर धोंडगे यांची माहिती

0

परिवर्तन आघाडीच्या नेतृत्वात २८८ उमेदवार देणार

-माजी खा. राजू शेट्टी, वामनराव चटप, शंकर धोंडगे यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर : सत्ताधारी व विरोधक प्रस्तापित आहेत. अर्धे इधर अर्धे उधार अशी सध्याची स्थिती आहे. यामध्ये छोटे छोटे पक्ष, संघटना संपविण्याचा घाट बांधला जात आहे. त्यांना शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी यांचे त्यांना काहीच देणे घेणे नाही. याला आळा घालायचा असेल तर चळवळीतील सर्वांना एकत्रित येणे आवश्यक झाले आहे. याचा विचार करून आम्ही एकत्रित आलो व येत आहोत. परिवर्तन आघाडीच्या नेतृत्वात २८८ जागेवर उमेदवार देणार आहोत. १४५ जागा आम्ही जिंकू आणि सत्ता स्थापन केली जाईल, अशी माहिती राजू शेट्टी, वामनराव चटप, शंकर धोंडगे यांनी दिली.

यावेळी राजु शेट्टी म्हणाले की, केंद्र व राज्यातील सत्ताधारी हुकुमशाहा झाले आहेत. विरोधक त्यांचेच आहेत. अलटून पलटून ते सत्तेत येतात. पक्ष फुट व त्यांचे भांडण यातच ते मश्गुल आहेत. त्यांना शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही. शेतकरी आत्महत्या प्रचंड वाढत चालल्या आहेत. सत्ताधारी व विरोधकांचा माज उतरवण्यासाठी चळवळीतील सर्व पक्ष व संघटनांना, नेत्यांनी जबाबदारी झटकून चालणार नाही, हा प्रथम विचार केला. तसेच मतभेद विसरून एक होणे नितांत गरजेचे झाले आहे. त्यासाठी पहिली बैठक १८ जुलै रोजी पुण्यात पार पडली. बैठकीला स्वातंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, स्वाभिमानी संघटना आणि बीआरएसचे नेते उपस्थित होते. सर्वांनी आपण सर्व शेतकरी कष्टकरांच्या प्रश्नांसाठी काम करतोय. तर एकत्रित आलेच पाहिजे, यावर सर्वांचे एकमत झाले. परिवर्तन आघाडी स्थापन केली.

पहिला संयुक्त मेळावा शेगावमध्ये

परिवर्तन आघाडीचा पहिला संयुक्त मेळावा बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे २४ आॅगस्ट रोजी होणार असल्याची माहिती शेट्टी, चटप व धोंडगे यांनी दिली. यावेळी स्वातंत्र भारत पक्षाचे अनिल घनवट, आदी नेते उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी २०११ मध्ये आवाज उठवला होता, असे शेट्टी म्हणाले. सर्वांनी एकत्रित आणून एक सक्षक पर्याय मतदारांना देणार आहोत. त्यामुळे मतदार सत्ताधारी व विरोधक दोघांचे गणपती यावेळी बुडवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.