बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

संभाजीनगरला पहिल्यांदाच मान मिळाला

0

बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

– संभाजीनगरला पहिल्यांदाच मान मिळाला

छत्रपती संभाजीनगर : ज्यावेळी रक्तवाहिन्यांच्या आजारावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते त्यावेळी रिस्क आणि रुग्ण बरा होण्याचा कालावधी दोन्हीत वाढ होते. सध्या आधुनिक वैद्यकीय तंत्राच्या आधारे रक्तवाहिन्यांच्या आजारावर बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करून रिस्क आणि रुग्ण बरा होण्याच्या कालावधी दोन्ही कमी करता येतो. या संदर्भात दोन दिवसाची राष्ट्रीय परिषद दि. ३ आणि ४ आॅगस्टला संभाजीनगरात होत आहे. ही राष्ट्रीय परिषद संभाजीनगरला पहिल्यांदाच घेण्याचा मान मिळाला आहे.
यासंदर्भात परिषदेचे संयोजक डॉ. शिवाजी पोले म्हणाले की, इंडियन सोसायटी ऑफ व्हेस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजि आणि इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्तविद्यमाने रक्तवाहिन्यांच्या आजारांवरील आधुनिक उपचार पद्धतींवर परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. ही राष्ट्रीय परिषद संभाजीनगरला पहिल्यांदाच घेण्याचा मान मिळाला असून या निमित्ताने महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील डॉक्टरांपर्यंत उपचाराच्या आधुनिक पद्धती पोचतील आणि त्याचा फायदा रुग्णांना होईल, अशी माहिती दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

चुकीच्या जीवनपद्धतीमुळे रक्तवाहिन्यांच्या आजारातही वाढ होत आहेत. या आजारावर अत्याधुनिक शत्रक्रिया हा उपचार असला तरी अनेकदा त्यातील धोका जास्त असतो. हा धोका बिनटाक्यांच्या शत्रक्रियामुळे कमी होतो. हेच तंत्रज्ञान रुग्णांपर्यंत पोचवण्याची मोहीम आयएसव्हीआयआरने हाती घेतली आहे. दोन दिवसांच्या या राष्ट्रीय परिषदेत देशभरातून आलेले २०० हुन अधिक तज्ञ डॉक्टर मेंदूतील रक्तवाहिन्यांवरील पैरालिसिस, रक्तस्राव वर उपचार, हातापायाच्या रक्तवाहिन्यांचे गंगरीन, वेनचे आजार, पोटात आणि छातीत होणारा रक्तस्त्राव, कॅन्सर यावरील इण्टरवेन्शनल रेडियोलोजी चा उपचार, जी.आय इंटरव्हेन्शन म्हणजेच पचन संस्थेशी संबंधित विविध विकारांचे निदान आणि उपचार करण्यासाठी केलेल्या वैद्यकीय प्रक्रिया अशा अनेक विषयावर चर्चा आणि प्रत्यक्ष केसेस सदरीकरण व मार्गदर्शन होणार आहे.

परिषद रूग्णांसाठी वरदान ठरेल : डॉ. शिवाजी पोले

मराठवाड्यात डॉ. शिवाजी पोले मागील बारा वर्षांपासून रुग्णांवर या नवीन पढ़तीने उपचार करत आहेत. तथापी परिषद पहिल्यांदाच होत आहे. या परिषदेसाठी आयएसव्हीआय आरचे अध्यक्ष डॉ. शामकुमार केशवा, डॉ. राजेश मुंदडा, डॉ. अमर मुकुंद, सचिव डॉ. अजित यादव व इतर पदाधिकारी यांच्यासह संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. शिवाजी पोले ही परिषद यशस्वी व रूग्णना वरदान ठरेल याचा प्रयत्न करत आहेत.

प्रमुख उपस्थिती

हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे ३ ऑगस्ट रोजी ५ वाजता परिषदेचे उदघाटन राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि इंडियन मेडिकल एसोसिएशन चे पदाधिकारी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, एमजीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोरा, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, मुंबईच्या केईएम रुग्णालयाचे डॉ. हेमंत देशमुख, डॉ. उदय लिमये व इतरांच्या यांच्या उपस्थितीत होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.