नवी मुंबईत ३ मजली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू

पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ बचावकार्य

0

नवी मुंबईत ३ मजली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू

पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ बचावकार्य केले.

नवी मुंबईतील शाहबाज गावात मुसळधार पावसात तीन मजली इमारत कोसळली. या इमारतीत 24 कुटुंबे राहत होती. अनेक लोक अडकले होते, तर ढिगाऱ्यातून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ बचावकार्य केले.

नवी मुंबईत ३ मजली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू असताना शाहबाज गावात २४ कुटुंबे राहत असलेली Ground + 3 Floor असलेली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनास्थळी मुंबई पोलिस, NDRF चे जवान, अग्निशमन दल इत्यादी पथकांनी पोहचून मदत कार्य सुरु केले. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत जवळपास ५० अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश आले. तर अनेक जण अडकल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे हि इमारत आज २७ जुलै २०२४ ह्या पाहते 5 वाजता कोसळली. ही Ground + 3 Floor इमारत आहे. दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे आणि दोन जण अडकले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफची टीम येथे आहे, बचाव कार्य सुरू आहे,”

नवी मुंबईचे उप अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “आम्हाला पहाटे 4.50 वाजता इमारत कोसळल्याचा फोन आला. दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. दोन जण अडकले असण्याची शक्यता असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.