जायकवाडी धरणात 3 टीएमसी पाणीसाठा शिल्लक

धरणातील पाणीसाठा जैसे थे

0

जायकवाडी धरणात 3 टीएमसी पाणीसाठा शिल्लक

-धरणातील पाणीसाठा जैसे थे

पैठण : राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत असत असला तरी मराठवाड्यात मात्र अजून हलक्या ते मध्यम सरीच आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाºया पैठणच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा अजून जैसे थे च आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटल्या आहे. त्यात जायकवाडी धरणात आज केवळ ४.१ टक्के म्हणजेच केवळ ३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.

जलसंपदा विभागाने नोंदवलेल्या पावसाच्या नोंदीनुसार, मागील वर्षी १ जून ते जुलै दरम्यान केवळ ६४ मिमी पावसाची नोंद झाली होती. ती यंदा २०४ मिमी एवढी झाली आहे. जुलै महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह बहुतांश ठिकाणी पावसाने दडी मारल्याने शेतकºयांसह नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याचे चित्र आहे. जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने जायकवाडीच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झाली नसल्याचे सांगितले जात आहे. जायकवाडी धरणात 3 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

जायकवाडी धरणात 3 टीएमसी पाणीसाठा शिल्लक : राज्यभरातील धरणांमध्ये आता हळूहळू पाणी साठ्यात वाढ होत असली तरी मराठवाड्यातील लघु मध्यम व मोठी अशी एकूण ९२० धरणे मात्र अजून १०.६० टक्के भरली आहेत. राज्यातील इतर पाच विभागांच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठा सर्वात कमी असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. यामध्ये आता १४ जुलै रोजी मोजण्यात आलेल्या पाणीपातळीनुसार जायकवाडी धरणात आज ८७.११ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी हा पाणीसाठा २७.१४% एवढा होता.

९० टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण

हवामान विभागाकडून मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असला तरी अजूनही तुरळक भागात हलक्या सरीच येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागात ९० टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून पावसाच्या मोठ्या पावसाची वाट पाहताना दिसत आहेत.

पाऊस होणार असल्याचा अंदाज

मागील वर्षी पावसाच्या विस्कळीतपणामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. हवामान विभागाने या वर्षी सरासरीहून अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज दिल्यानंतर शेतकºयाला चांगल्या पावसाची आशा आहे. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.