पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

-बिस्कीट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास

0

पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

-बिस्कीट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास

छत्रपती संभाजीनगर : येथील जिल्हा परिषद शाळेत ५० हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याची घटना समारे आली आहे. बिस्कीट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाले. यातील अनेक विद्यार्थी तापाने फणफणल्याचे सांगितले जात आहे. यावेही या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार पैठण तालुक्यातील केकत जळगावमधील जिल्हा परिषद शाळेत घडला आहे.

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शनिवारी बिस्किट वाटप करण्यात आले होते. हे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांचे पोटदुखी सुरू झाली. तर काही विद्यार्थ्यांना जणांना मळमळ, उलट्या झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ताप भरल्याने या सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांना सलाइन लावण्यात आले असून सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून सांगितली जात आहे.

पालकांमध्ये भीतीचे वातावरण

जिल्हा परिषद शाळेत वाटप केलेल्या बिस्किटांमुळे विषबाधा झाल्याचे उघड झाल्याने विद्यार्थ्यांचे पालक संतापले आहेत. शाळेत दिल्या जाणाºया खाद्यामधून विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याचे प्रकार अलीकडे वाढल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना बिस्किट देण्याआधी त्याची मुदत तपासली गेली होती का? असा प्रश्न देखील पालकांनी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.