आसामच्या उच्च न्यायालयाकडून आसारामला मिळाला दिलासा

-आसारामवर पुण्यातील माधवबाग आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार

0

आसामच्या उच्च न्यायालयाकडून आसारामला मिळाला दिलासा

-आसारामवर पुण्यातील माधवबाग आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार

गुवाहाटी : जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम याला उच्च न्यायालयाकडून ७ दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी पॅरेल देण्यात आला असून आसारामवर पुण्यातील माधोबाग आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. आसारामच्या न्यायालयातील न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांनी हा पॅरोल मंजूर केला आहे. आसाराम गेल्या चार दिवसांपासून जोधपूर एम्समध्ये दाखल आहे.

मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामने उपचारासाठी पॅरोलसाठी अर्ज केला होता, मात्र तो प्रत्येक वेळी फेटाळण्यात आला होता. यापूर्वी जोधपूर येथील खासगी आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी आसारामला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. याठिकाणी आसारामने पुण्यातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतले मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्याला जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले. आसारामला जोधपूर पोलिसांनी २०१३ साली इंदूरमधील आश्रमातून अटक केली होती. तेव्हापासून आसाराम तुरुंगात होता. पाच वर्षांच्या प्रदीर्घ खटल्यानंतर २५ एप्रिल २०१८ रोजी न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

३१ ऑगस्ट २०१३ रोजी आसारामला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले. तुरुंगात दाखल करताना आसारामची वैद्यकीय तपासणी केली तेव्हा तो स्वस्थ होता. यावेळी त्याला कोणताही आजार नसल्याचे समोर आले होते. मात्र एका महिन्यानंतर आसारामने आपल्या त्रिनाडी शूळ आजाराबाबत सांगितले होते.

आसारामकडून महिला डॉक्टरची मागणी

यावेळी तो म्हणाला की, मी सुमारे साडे १३ वर्षांपासून त्रिनाडी शूळ नावाच्या आजाराने त्रस्त असून महिला वैद्य नीता गेल्या २ ते ३ वर्षांपासून माझ्यावर उपचार करत होत्या. माज्या उपचारासाठी नीताला मध्यवर्ती कारागृहात ८ दिवस येण्याची परवानगी द्यावी. त्यानंतर वैद्यकीय मंडळाने आसारामची तपासणी केली असता त्याला असा कोणताही आजार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बलात्कार केल्याप्रकरणी दोषी

२५ एप्रिल २०१८ रोजी जोधपूरच्या विशेष पॉक्सो न्यायालयाने आसारामला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आसाराम २ सप्टेंबर २०१३ पासून तुरुंगात आहे. दोन वर्षांपूर्वी, गुजरातच्या एका न्यायालयाने आसारामला २०१३ मध्ये त्याच्या सुरतच्या आश्रमात एका महिला अनुयायीवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

गुजरातमधील गांधीनगर येथील आश्रमातील एका महिलेने आसारामवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. ३१ जानेवारी २०२३ रोजी न्यायालयाने आसारामला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.