बीड जिल्ह्यातील ९८ शाळा इमारत नसल्याने उघड्यावरच
-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उघड्यावर शाळा भरवत आंदोलन
बीड : जिल्ह्यातील ९८ जिल्हा परिषद वस्ती शाळांना मागील दहा वर्षांपासून स्वत:च्या हक्काची शाळा इमारत नसल्याने या शाळा उघड्यावर भरत आहेत. यामध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील १८ शाळांचा समावेश आहे. ज्या शाळांना इमारत नाही अशा शाळांना जिल्ह्यातील शाळेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जावा, या मागणीसाठी सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उघड्यावरच शाळा भरवत आंदोलन केले. त्यामुळे या शाळाकडे शासन आणि प्रशासन खरच लक्ष देईल की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उघड्यावरची शाळा आंदोलन केले. यावेळी त्यांनी शाळा इमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत तातडीने निधी मंजूर करून देऊन इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी या मागणीसाठी सोमवारी शेख युनूस, शेख मुबी, मुस्ताक शेख, शिवशर्मा शेलार, अशोक येडे सहभागी झाले होते. जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
मराठवाड्यात सात महिन्यांत 511 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
आसामच्या उच्च न्यायालयाकडून आसारामला मिळाला दिलासा
अनधिकृत जाहिरातींमुळे रजिस्ट्रारकडून मनपा अधिकाऱ्यांची कानउघाडणी
लिंबाच्या झाडाखाली भरणारी शाळा
अंबाजोगाई तालुक्यातील चनई तांडा येथे २०१४ पासून जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू असुन इयत्ता १ ते ५ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. १० वर्षांपासून या शाळेला इमारत नसल्याने ही शाळा तांड्यावरील एका लिंबाच्या झाडाखाली भरते. मात्र सध्या पावसाचे दिवस असल्याने या ताड्यावरील लहू आडे यांनी स्वत:चे राहते घर शाळेसाठी उपलब्ध करून दिले आहे.
निधीसाठी प्रस्ताव पाठवला
शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी सांगितले की, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २४७३ शाळा आहेत. सध्या ज्या शाळेला इमारती नाहीत त्या सर्ववस्तीशाळा असल्याने त्यांना इमारती नाहीत. उघड्यावर भरणाºया या वस्तीशाळांना इमारत मिळावी म्हणून यंदाही जिल्हा नियोजन समिती व सर्व शिक्षा अभियान पुणे यांना निधीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर ९८ शाळांचे बांधकाम पूर्ण होईल, असे सांगितले.