जिल्हा परिषदेच्या 98 शाळा 10 वर्षांपासून ईमारत विरहीत

-ईमारत विरहीत शाळांसदर्भात शिक्षण विभागाला कोणतेही गांभीर्य नसल्याचे समोर

0

जिल्हा परिषदेच्या 98 शाळा 10 वर्षांपासून ईमारत विरहीत

-ईमारत विरहीत शाळांसदर्भात शिक्षण विभागाला कोणतेही गांभीर्य नसल्याचे समोर

बीड : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ९८ शाळा या तब्बल १० वषार्पासुन ईमारत विरहीत असुन या शाळा झाडाखाली, पत्र्याच्या शेडमध्ये, समाज मंदिरात तर काही ठिकाणी किरायाच्या रूममध्ये भरत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी पायाभूत सुविधा नसल्याचे दिसून येत आहे. शासन मात्र दुसरीकडे शिक्षणावर कोट्यावधींचा खर्च केल्याचा जाहिरातीतुन गाजावाजा करीत असले तरी मात्र प्रत्यक्षात काय असा प्रश्न या शाळांकडे बघुन पडल्याशिवाय राहत नाही. ईमारत विरहीत शाळांसदर्भात शिक्षण विभागाला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत नाही.

जिल्हा परिषदेच्या ९८ शाळा या तब्बल १० वषार्पासुन ईमारत विरहीत असुन या शाळा झाडाखाली, पत्र्याच्या शेडमध्ये, समाज मंदिरात तर काही ठिकाणी किरायाच्या रूममध्ये भरत आहेत. यामुळे जिल्ह्यातील या शाळांना शाळा इमारतीसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी लेखी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) जिल्हा परिषद बीड यांना केली आहे.

यावेळी मुख्याध्यापक गणेश ढाकणे यांनी सांगितले की, जुन २०२३ पासुन कोटुळे वस्तीवर कार्यरत असुन बीड शहरातील केंद्रीय शाळा धोंडीपुरा अंतर्गत कोटुळे वस्ती शाळेला इमारत नाही.पत्र्याच्या शेडमध्ये मुलांना जागा पुरत नाही. झाडाखाली शाळा भरवावी लागते.सध्या विद्यार्थी पटसंख्या ३४ असुन शाळेतील असुविधा विषयी शिक्षण विभागाला कळवण्यात आले आहे. परंतु अद्याप ईमारती साठी निधी मिळालेला नाही. तसेच बीड शहरापासुन ८ किलोमीटर अंतरावरील २५० लोकसंख्या असलेल्या कोटुळे वस्ती वर २००३ पासुन वस्ती शाळा असुन तेव्हा पासून १० वर्षं १००० रुपये महिना कंत्राटी तत्वावर काम केलेले आहे.२०१३ पासुन शासनमान्यता मिळालेली आहे. आमचे बंधु काकासाहेब कोटुळे यांनी शाळेसाठी ६ गुंठे जागेचे दानपत्र करून दिलेले आहे. मात्र अद्याप शाळेसाठी इमारत बांधकाम करण्यात आले नसल्याची माहिती सहशिक्षिका माधुरी कोटुळे यांनी दिली.

सरकारने पक्का ईमारतीची सोय करावी

शाळेला पक्की इमारत नसल्याने ही शाळा झाडाखाली भरते मात्र पाऊस आल्यावर शाळा भरविण्यासाठी मोठा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ्यात वादळवारा येत असल्याने शाळेत आलेल्या लेकरांची काळजी वाटते त्यामुळे सरकारने पक्का ईमारतीची सोय करावी, अशी मागणी पालक मनिषा कोटुळे, बिभीषण कोटुळे यांनी केली आहे.

इमारत नसलेल्या शाळा

बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील २८, केज तालुक्यातील १७, परळी तालुक्यातील १२, माजलगाव तालुक्यातील ११,गेवराई तालुक्यातील ११,अंबेजोगाई तालुक्यातील ६, शिरूर तालुक्यातील ५, पाटोदा तालुक्यातील ३, धारूर तालुक्यातील ३, आष्टी आणि वडवणी तालुक्यातील प्रत्येकी १ अशा एकुण ९८ जिल्हा परिषद वस्ती शाळा इमारत विना आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.