Hardik Pandya-Natasa Stankovic divorce – हार्दिक पांड्याने नतासा स्टॅनकोविचसोबत घटस्फोटाची पुष्टी केली: ‘कठीण निर्णय”
मी आणि नताशा एकत्रितपणे राहण्यासाठी आणि या नात्याला टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले
Hardik Pandya- Natasa Stankovic divorce confirm by Hardik’s Instagram Post
सोशल मीडियावर येऊन Hardik Pandya पंड्याने एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे की, “मी आणि नताशा एकत्रितपणे राहण्यासाठी आणि या नात्याला टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आमचे सर्व काही दिले आणि आम्हाला विश्वास आहे की विभक्त राहणे हे आम्हा दोघांच्या हिताचे आहे.”
हार्दिक पांड्याने आपल्या इंस्टाग्राम वरील पोस्टवर त्यांचा मुलगा अगस्त्या याबद्दल याचे हे दोघे सह पालक होणार असल्याचे नमूद केले आहे. तसेच त्याने आपल्या या इंस्टाग्राम पोस्टवरील कंमेंट्स सेक्शन डिसेबल केले आहे. जेणेकरून नेटकऱ्यांकडून कोणतेही वाद होणार नाही.
क्रिकेटपट्टू हार्दिक पंड्या आणि नताशा बद्दल घटस्पोटाच्या चर्चा आधीच सुरु होत्या. त्यानंतर स्वतः हार्दिक पंड्याने गुरुवारी त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत घटस्फोटाच्या अफवाना इंस्टाग्रामवर पोस्ट करून कन्फर्म केले. या पोस्टमध्ये हार्दिक पंड्या म्हणतो “४ वर्षाच्या एकत्रित प्रवास आम्ही एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.”
पंड्याच्या पोस्टवरील मजकूर खालील प्रमाणे आहे.
सोशल मीडियावर पंड्या म्हणतो कि “आम्ही दोघांनीही एकत्रित राहण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत सर्वस्व दिले आणि आता या निर्णयावर आहोत कि वेगळे होणे हे दोघांसाठीही हिताचे आहे. आम्ही आनंदाने एकमेकांचे आदर आणि साहचर्य लक्षात घेऊन आम्ही कुटुंब वाढवत असताना हा निर्णय घेणे खूप कठीण होते. आम्ही अगस्त्याला आशीर्वाद देतो आणि आमचे प्रथम प्राधान्यस्थान तोच असेल. आणि त्याच्या आनंदासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न कायम करत राहू, यासाठीच आम्ही सहपालक राहणार आहोत. ”
तसेच हार्दिक पंड्या आपल्या पोस्टमध्ये समर्थकांशी निवेदन करतो कि ” या कठीण आणि संवेदनशील काळात आम्हाला प्रायव्हसी देण्यासाठी तुमचे समर्थन आणि समजूतदारपना लाभेल यासाठी मी मनापासून प्रार्थना करतो. ”
हार्दिक पांड्याचे इंस्टाग्राम वरील पोस्ट
नतासा स्टॅनकोविचची इंस्टाग्राम वरील पोस्ट
हार्दिक पांड्या आणि नतासा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट
मागील महिन्याभरापासून अधिक काळ हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या आहेत. तसेच मागील महिन्यात सर्बियन मॉडेल नताशाने आपल्या सोशल मीडिया वरून लग्नाचे सर्व फोटो काढून टाकले होते तसेच आपल्या नावासमोरील पंड्या हे आडनावही काढून टाकले होते,. तेंव्हापासूनच सोशल मीडियावर चर्चाना उधाण आले होते.
आणि तेंव्हापासून हार्दिक पंड्या आणि नताशाचे कोणतेही दोघे एकत्रित असलेले फोटो सोशल मीडियावर दिसून आले नाहीत. पंड्याने ४ मार्च रोजीच्या त्याच्या पत्नी नताशाच्या वाढदिवसाची एकही फोटो किंवा स्टेटस शेअर केला नाही. यावरून नेटकर्यांना अगोदरच कळले होते कि यांच्या वयक्तिक आयुष्यात कांहीतरी बरोबर चालत नाहीय. आणि शेवटी हार्दिक पंड्याच्या या पोस्टाने पुष्टी केलेली आहे.