तालुकास्तरीय उजळणी वर्गाचे आयोजन

स्काऊट गाईड अभ्यासक्रमात गुणात्मक वाढ करण्याचा उद्देश

0

तालुकास्तरीय उजळणी वर्गाचे आयोजन
– स्काऊट गाईड अभ्यासक्रमात गुणात्मक वाढ करण्याचा उद्देश

बीड : जिल्ह्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत स्काऊट गाईड अभ्यासक्रमात गुणात्मक वाढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि बीड भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील तालुकास्तरीय उजळणी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील शाळेतून स्काऊट गाईड विभागाच्या प्रत्येकी एक-एक युनिट लीडर्सने सहभाग व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


हे पण वाचा
मुलांच्या दप्तराचे ओझे कधी कमी होणार?
आरटीई लकी ड्रॉ मुळे प्रवेश रखडले

या तालुकानिहाय उजळणी वर्गाद्वारे जिल्ह्यातील शिक्षकांना अभ्यासक्रमातील विद्यार्थी वयोगटनिहाय अभ्यासक्रमाबाबत, स्काऊट गाईड, कब बुलबुल, रोव्हर रेंजर यांच्यासह, युनिट लिटरच्या प्रगतीचे टप्पे विविध, प्रशिक्षणे जिल्हा संस्था रचना आणि आॅनलाईन युनिट नोंदणी अशा विषयाचे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांसाठी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत उजळणी वर्ग होणार असल्याची माहिती जिल्हा स्काऊट गाईडचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवानदास फुलारी आणि स्काऊट विभागाचे जिल्हा आयुक्त तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी दिली आहे.

उजळणी वर्गाचे वेळापत्रक

मंगळवार २३ जुलै रोजी गेवराई तालुक्यातील शिक्षकांसाठी पंचायत समिती सभागृह, बुधवार, ता. २४ जुलै – रोजी केज तालुक्यातील शिक्षकांसाठी धारूर पंचायत समिती सभागृह, गुरुवारी अंबाजोगाई- परळीसाठी गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळा, शुक्रवारी बीड- पाटोदा, शिरूर, वडवणी तालुक्यातील शिक्षकांसाठी स्काऊट भवन, सोमवारी माजलगाव तालुक्यासाठी जवाहर माध्यमिक विद्यालय केसापुरी कॅम्प (माजलगाव). मंगळवारी (दि. ३० जुलै) पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय (आष्टी) या शाळांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.