ठेवीदारांचे पावणेचार हजार कोटी अडकले-पोलिस तपासातून उघड

ज्ञानराधा पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात कुटेंच्या आडचणीत वाढ

0

ठेवीदारांचे पावणेचार हजार कोटी अडकले-पोलिस तपासातून उघड

-ज्ञानराधाच्या कुटेंच्या आडचणीत वाढ

बीड : ज्ञानराधा पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात पोलिस तपासातून घोटाळ्याचा डोळे दिपवणारा आकडा समोर आला आहे. ज्ञानराधा पतसंस्थेत पावणेचार लाख ठेवीदार आणि बचत खातेदार यांचे तब्बल ३ हजार ७१५ कोटी ५८ लाख ७२ हजार रुपये अडकलेले असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. तर सुरेश कुटेंच्या राज्यभरातील २०० कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या १२० मालमत्तांची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. इतर राज्यातील मालमत्तांचाही शोध सुरु असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली. यामुळे ज्ञानराधाचे सुरेश कुटे यांच्या आडचणीत वाढ झाली आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था कुटे ग्रुपवर नोव्हेंबर २०२३ मध्ये पडलेल्या प्राप्तीकर विभागाच्या छाप्यानंतर आर्थिक अडचणीत आलेली आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास पतसंस्था असमर्थ ठरल्याने पतसंस्थेत मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान,९ महिने उलटूनही ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी पोलिस व न्यायालयात धाव घेत गुन्हा नोंद करण्याचे सत्र सुरु केले होते. ज्ञानराधाच्या बीड जिल्ह्यात २२ शाखा असून, आतापर्यंत ३५ गुन्हे नोंद झाले आहेत. २० कोटी २२ लाखांच्या फसवणूक प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत.

हे पण वाचा
UPSC चेअरमन Manoj Soni यांनी दिला राजीनामा – हे दिले कारण
पिकावरील बुरशी प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त
लाडका भाऊ योजनेसाठीचे फक्त हेच युवक पात्र

कुटे कुटुंबीयांची २०० कोटीची संपत्ती

सुरेश कुटे व कुटुंबीयांच्या २०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या १२० संपत्तीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर इतर राज्यातील नोंदणी महानिरीक्षकांनाही पोलिसांनी पत्र देत कुटेंच्या संपत्तीची माहिती मागवली आहे. कुटेच्या २४ लाख २० हजार रुपयांची ३ वाहने जप्त केली.

खातेदारांची संख्या ३ लाखांवर

पोलिसांनी ज्ञानराधा मधील सॉफ्टवेअरमधील माहिती मिळवली असून त्यानुसार मुदत ठेव ठेवणाºया खातेदारांची संख्या १ लाख ६५ हजार ८७२ इतकी आहे. त्यांनी १७९० कोटी १ लाख ३७ हजारांची मुदत ठेव ठेवली आहे. तर, बचत खाते असलेल्यांची संख्या २ लाख ६ हजार ६९७ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.