कुटेंविरूध्दच्या वॉरंटसाठी पोलिस न्यायालयात

ठेवीदार संघर्ष कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा

0

कुटेंविरूध्दच्या वॉरंटसाठी पोलिस न्यायालयात
– ठेवीदार संघर्ष कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा
बीड : शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे यांना काही दिवसांपूर्वी जालना आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक करून जालना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने कुटे यांची अटक बेकायदेशीर ठरवली होती. त्याच दिवशी कुटे यांनी बीड जिल्हा कारागृहात रवानगी केली. या गुन्ह्यातून बीड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात ट्रान्सफर वॉरंट मिळण्यासाठी सोमवारी पोलिस बीड जिल्हा सत्र न्यायालयाकडे परवानगी मागण्याची शक्यता आहे.तर दुसरीकडे रास्ता रोको आंदोलन करणार आहोत, असे ठेवीदार संघर्ष कृती समितीचे सचिन उबाळे यांनी सांगितले.

Briton मधील लीड्स शहरात हिंसाचारामुळे जाळपोळ हल्लेखोरांकडून पोलिस व्हॅनवर हल्ला

नॅचरल शुगर (Natural Sugar) कारखाना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार
मागील पंधरा दिवसांत ठेवीदारांच्या ठेवी मिळाल्या नाहीत आणि उर्वरित आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने शनिवारी बीडमध्ये ठेवीदारांनी बैठक घेऊन उद्या सोमवार, २२ जुलैला सकाळी साडेअकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जालना न्यायालयाकडून अटक बेकायदेशीर न्यायालयीन कोठडीत असलेले ज्ञानराधाचे चेअरमन कुटे यांना जालना पोलिसांनी बीड जिल्हा कारागृहातून ताब्यात घेऊन जालना न्यायालयासमोर हजर केले होते. कुटे यांच्या वकिलांनी आक्षेप घेत अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.

बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलनाचा भडका आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने कर्फ्यू लागू
बीड तालुका व शहरातील सर्व मल्टीस्टेटच्या ठेवीदारांची शनिवारी सूर्या लॉन्स येथे सकाळी ११.३० वाजता ठेवीदार संघर्ष कृती समितीचे मुख्य प्रवर्तक सचिन उबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. मागील पंधरा दिवसाच्या काळात ज्ञानराधा मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद काळे, साईराम मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शाहीनाथ परभणे, राजस्थानी मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांना अटक केली नसल्याने आंदोलन करणार आहे.
येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट मुख्य शाखेतील मुख्य लिपिक संतोष मोहन जोगदंड व सहायक वित्त अधिकारी संतोष सुरवसे यांना आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान शनिवारी दुपारी तीन वाजता दोघांना बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कोरोनाच्या मृत्यूची सरकारी आकडेवारी खोटी असल्याचे उघड सरकारी आकडेवारीपेक्षा ८ पट अधिक मृत्यू झालाचे संशोधनातून समोर – भारतात २०-६५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अल जझीरानचा दावा

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला मनोज जरांगे यांची सरकारच्या योजनेवर टीका
रास्तारोको आंदोलन करणार
मल्टीस्टेटच्या अध्यक्षांच्या मालमत्ता विक्री करून ठेवीदारांच्या तातडीने ठेवी द्याव्यात या मागणी साठी मी २७ जुन ते ३ जुलै २०२४ पर्यंत सात दिवस उपोषण केले होते. उपोषण सोडते वेळी जिल्हा उपनिबंधक समृध्द जाधव यांनी या मल्टिस्टेटचा प्रस्ताव सहकार आयुक्त यांना पाठवणार असल्याचे म्हटले होते. आता सोमवारी रास्तारोको आंदोलन करणार आहोत, असे ठेवीदार संघर्ष कृती समितीचे सचिन उबाळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.