NEET2024: १ लाख लोकसंख्येमागे एमबीबीएसच्या १० जागा आवश्यक

भारत डब्ल्यूएचओच्या निकषापेक्षा अधिक असल्याचे समोर

0

NEET2024: मेडिकल कौन्सिलच्या नियमाप्रमाणे लाखामागे एमबीबीएसच्या १० जागा आवश्यक


-भारत डब्ल्यूएचओच्या निकषापेक्षा अधिक असल्याचे समोर

छत्रपती संभाजीनगर : सध्या देशात मेडिकल कॉलेजची संख्या ४७९ वरून ७०६, तर मेडिकलच्या जागा ६७,३५२ वरून १ लाख ८ हजारांवर पोहोचल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाºया नीट परीक्षेची सुरुवात झाल्यापासून ८ वर्षांत देशातील प्रवेशासाठी अर्ज करणाºया विद्यार्थ्यांची संख्या १०.९ लाखांवरून २३.३ लाख झाली आहे. कॉलेज व जागा वाढल्या असताना उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण पूर्वीइतकेच ५७% कायम आहे. मेडिकल कौन्सिलच्या नियमाप्रमाणे १ लाख लोकसंख्येमागे एमबीबीएसच्या १० जागा आवश्यक आहेत. पण महाराष्ट्रात हे प्रमाण ९ आहे. तरीही रुग्ण-डॉक्टर प्रमाणात भारत डब्ल्यूएचओच्या निकषापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवणार
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला
शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, काय आहे प्रकरण?

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने २०१३ मध्ये नीट परीक्षा सुरू केली. ही परिक्षा उर्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश करता येतो. मात्र त्यास सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिल्याने ती रद्द झाली. २०१६ मध्ये पुनर्विलोकन याचिकेवर ५ सदस्यीय पीठाने नीटचा मार्ग मोकळा केला. २०१७ पासून आॅल इंडिया प्री-मेडिकल टेस्ट व राज्याच्या परीक्षा रद्द करत देशभरात नीट सुरू झाली. सुरूवातीला सीबीएसईतर्फे घेतली जाणारी परीक्षा २०१९ पासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाऊ लागली. मात्र नुकत्याच झालेल्या नीट परिक्षेत सावळा गोंधळ झाल्याने अनेकांच्या स्वप्नावर पाणी फिरले.

कोरोनाच्या मृत्यूची सरकारी आकडेवारी खोटी असल्याचे उघड
शेतीच्या योजनांसंदर्भात घोटाळ्याचे काय झाले?

महाविद्यालयांच्या संख्येत वाढ मात्र स्पर्धा कायम


३८७ वैद्यकीय महाविद्यालये २०१४-१५ मध्ये देशात होती. ४७९ वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या २०१७-१८ मध्ये होती. ७०६ महाविद्यालये २०२३-२४ मध्ये झाली. कॉलेज, जागा वाढूनही स्पर्धा कायम आहे. यामध्ये २०१७ मध्ये सुमारे ११.३८ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेचे अर्ज भरले. यापैकी १०.९ परीक्षेला बसले, तर ६.११ पात्र ठरले. २०२४ मध्ये २४ लाख अर्ज आले. यापैकी २३.३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यापैकी १३.१६ लाख विद्यार्थी पात्र ठरले. ८ वर्षांत विद्यार्थी संख्या १०५% वाढली. दरवर्षी सरासरी ५७% विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

NEETकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम


वैद्यकीय अभ्यासक्रमाचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. चांगल्या करिअरची शाश्वती आणि रुग्णसेवेतून समाजकार्याचे समाधान मिळते. त्यामुळे नीटकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम असून भविष्यातही वाढतच राहील, असे मत जीवशास्त्रज्ञ डॉ. केशव काळे यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.