टाटा मेमोरियल सेंटर येथे भरती सुरू
पदासाठी वॉक इन इंटरव्यू या पद्धतीने मुलाखती
टाटा मेमोरियल सेंटर येथे भरती सुरू
पदासाठी वॉक इन इंटरव्यू या पद्धतीने मुलाखती
Gramonnatti.com News
मुंबई: येथील टाटा मेमोरियल सेंटर येथे भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही दोन्ही पदे सहाय्यक डॉक्टर अशी असून यासाठी वय वर्ष 40 अशी वयोमर्यादा आहेे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या पदासाठी वॉक इन इंटरव्यू या पद्धतीने मुलाखती घेतल्या जातील. या पदासाठी दर महिना 1 लाख स्टायपेंड दिला जाणार आहे.
NEET2024: १ लाख लोकसंख्येमागे एमबीबीएसच्या १० जागा आवश्यक
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू काय म्हणाले मोदी?
टीएमसीमध्ये फेलो डॉक्टर या पदासाठीच्या 2 जागा या रिक्त आहेत. या दोन जागांसाठी इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. टीएमसी म्हणजेच टाटा मेमोरियल सेंटर यांनी मुंबई येथे भरती जाहीर केली आहे. या रिक्त पदांसाठी असलेल्या भरतीची घोषणा जुलै 2024 मध्ये करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांमधून मुलाखत प्रक्रियेतून योग्य उमेदवाराची निवड या फेलो डॉक्टर या पदाच्या दोन जागांसाठी केली जाईल.
वॉक इन इंटरव्यू अधिक माहिती साठी या लिंक वर क्लीक करा
M.Ch किंवा DNB Surgical Oncology हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहे. टीएमसी येथे सहकारी डॉक्टर म्हणून भरती झाल्यानंतर त्यांना दरमहा 1 लाखापर्यंत स्टायपेंड दिला जाईल. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी www.tmc.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तेथे ट्रेनिंग प्रोग्राम नावाच्या कॉलमला भेट द्यावी लागणार आहे.
शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, काय आहे प्रकरण?
टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे फेलो डॉक्टर म्हणजेच सहकारी डॉक्टर म्हणून रुजू होण्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. या पदासाठी 40 वर्षे ही वयोमर्यादा आहे. ओबीसी वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत तीन वर्षे अधिक सूट देण्यात येईल. तर एस सी किंवा एसटी या वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षे सूट देण्यात येईल.