पर्यावरण जनजागृतीसाठी इको क्लबची स्थापना
-उपक्रमात विद्यार्थ्यांना दिले जाणार पर्यावरणाचे धडे
पर्यावरण जनजागृतीसाठी इको क्लबची स्थापना
-उपक्रमात विद्यार्थ्यांना दिले जाणार पर्यावरणाचे धडे
छत्रपती संभाजीनगर : शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत असलेल्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून सर्व शाळांमध्ये इको क्लब स्थापन करण्यात येणार आहे. या उपक्रमात पर्यावरणाचे धडे देण्याबरोबरच विद्यार्थी शाळेत रोपटी लावतील आणि त्यांचे संगोपन करणयाचे धडे दिले जाणार आहे. या झाडांना विद्यार्थ्यांची, त्यांच्या वर्गांची नावे देण्यात येणार आहेत.
NEET2024: १ लाख लोकसंख्येमागे एमबीबीएसच्या १० जागा आवश्यक
स्मार्ट मीटर बसवणार सरकारी कार्यालयांमध्ये
चिकलठाण्यात गांजा विक्री करणाऱ्यांना अटक
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार समग्र शिक्षक अंतर्गत शाळेतील इको क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. या धोरणानुसार नवोपक्रमशील नागरिक तयार करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, पर्यावरणाच्या समस्या जाणून घेणे आणि पर्यावरण संरक्षणासाठी उपक्रम यांचा समावेश आहे.
इको क्लबअंतर्गत शाळांमध्ये पहिली ते बारावी या वर्गांतील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करायची आहे. त्यासाठी एका आठवड्याचे शिबिरही आयोजित करायचे आहे. शिबिराच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, शाश्वत अन्नप्रणाली स्वीकारणे, ई-कचरा कमी करणे, कचरा कमी करणे, ऊर्जा व पाणी बचत आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सात संकल्पनांवर आधारित उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच प्रशिक्षण देण्याची योजना आहे. नैसर्गिक साधन-संपत्तीचा वापर अतिशय काटकसरीने केला पाहिजे, त्याविषयी जागृतीही केली जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला
इको क्लब स्थापन करण्याच्या सूचना
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच पर्यावरण संवर्धनविषयी जागरूक असावे यासाठी प्रत्येक शाळेत इको क्लब स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फक्त क्लब स्थापन करून थांबायचे नाही, तर पर्यावरण विषयक जागृती, ई-वेस्ट, प्लास्टिक याचे होणारे परिणाम आणि दुष्परिणाम याचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.