छत्रपती संभाजीनगर शहरातील १४ सिग्नल बंद बेशिस्त वाहतूक
- वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली
शहरातील १४ सिग्नल बंद असल्याने बेशिस्त वाहतूक
– वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक दिवसेंदिवस बेशिस्त होत चालली आहे. वाहनचालकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. शहरात केवळ ३४ सिग्नल असून यातील १४ सिग्नल हे कायम बंद असतात. काही सिग्नल सुरू असताना तेथे पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी तैनात नसतात. त्यामुळे वाहनचालक वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करताना दिसून येतात.
छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्यां वाहतूक शाखेत २७६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे, तर शहरात महापालिका हद्दीत ३४ ठिकाणी महापालिकेने सिग्नल बसवलेले आहेत. ३४ सिग्नलवर प्रत्येकी दोन कर्मचारी तैनात करण्यात आल्यास ६८ कर्मचाऱ्यांमध्ये शहरातील वाहतूक सुरळीत होऊन वाहनचालकांना शिस्त लागू शकते, परंतु १४ सिग्नलवर कधीही पोलिस कर्मचारी हजर राहत नाहीत. त्यामुळे हे सिग्नल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. तसेच काही सिग्नल चालू असताना तेथे वाहतूक पोलिस हजर राहत नसल्याने वाहनचालक सिग्नल तोडून जात असल्याचे दिसून येते.
जायकवाडी धरणात 4.13 टक्के पाणीसाठा
गुन्हेगारी प्रवृत्तीला सीसीटीव्हीमुळे आळा बसेल मुंडे यांचे प्रतिपादन
तत्कालीन पोलिस आयुक्त संजय कुमार आणि अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात कमी झाली होती, परंतु या दोन्ही अधिकाऱ्यांना शहरातील वाहतूक प्रश्न सोडवता आला नाही हे मान्य केले होते. सीसीटीव्हीतून बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवली जात आहे. तरी देखील वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांत पावसासाठी सहस्रधारा अभिषेक
पर्यावरण जनजागृतीसाठी इको क्लबची स्थापना
चिकलठाण्यात गांजा विक्री करणाऱ्यांना अटक
पोलिस कर्मचारी नसलेले सिग्नल
टीव्ही सेंटर, टीव्ही सेंटर टी पॉइंट, चिश्चिया चौक, जवाहरनगर आणि समर्थनगर या चौकातील सिग्नल चालू असताना देखील पोलिस कर्मचारी हजर नसतात, तर कोकणवाडी चौक, जुबली पार्क, आमखास मैदान समोरील चौक, चंपा चौक, औरंगपुरा, रोपळेकर हॉस्पिटल समोरील चौक, सिल्लेखाना आणि महर्षी वाल्मीकी चौक या चौकातील सिग्नल अनेक महिन्यंपासून बंद असून या चौकात पोलिस तैनात नसतात.