मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन
लेखी आश्वासनानंतर तब्बल ९ तासानंतर आंदोलन मागे
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन
लेखी आश्वासनानंतर तब्बल ९ तासानंतर आंदोलन मागे
धाराशिव : मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांनी सोमवारी रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शहराजवळील हातलाई तलावात उतरुन जलसमाधी आंदोलन सुरु केले होते.
यामध्ये एका आंदोलनकर्त्याच्या तोंडात पाणी गेल्याने त्याची प्रकृती खालावली होती. त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर रात्री ७.३० वाजेपर्यंत अन्य ७ जण पाण्यात होते. त्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मराठा आंदोलकांना आपल्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोहचवू तसेच मराठा आंदोलकावरील दाखल गुन्हे मागे घेण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे तब्बल ९ तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर शहरातील १४ सिग्नल बंद बेशिस्त वाहतूक
जायकवाडी धरणात 4.13 टक्के पाणीसाठा
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सोमवारी (दि.२२) तिसरा दिवस होता. त्यांची तब्बेल खालावत चालल्यामुळे धाराशिव येथील मराठा आंदोलनांनी त्यांच्या मागण्यांची सरकारने तात्काळ दखल घ्यावी, या मागणीसाठी आठ मराठा आंदोलकांनी सोमवारी (दि.२२) सकाळी ११.३० वाजता धाराशिव शहराजवळील हातलाई तलावात जलसमाधी आंदोलन सुरु केले. आंदोलन सुरु होताच जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरु झाली.
दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास आंदोलक राहुल कुटे यांच्या तोंडात पाणी गेल्यामुळे त्यांची तब्बत खालावली. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतरही अन्य सातजण आपल्या मागण्यावर ठाम राहून तलावाच्या बाहेर निघण्यास तयार नव्हते.
गुन्हेगारी प्रवृत्तीला सीसीटीव्हीमुळे आळा बसेल मुंडे यांचे प्रतिपादन
चिकलठाण्यात गांजा विक्री करणाऱ्यांना अटक
प्रशासनाकडूनही ठोस काहीच उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे अन्य मराठा युवकांकडून आम्हीदेखील महिलासह पाण्यात उतरणार असल्याचा इशारा देण्यात येत होता. तसेच शहरातील बार्शी नाका येथे तर मराठा युवकांनी रस्तारोको आंदोलन सुरु केले. या आंदोलनामुळे शहरातील वातावरण चिघळते की काय अशी भिती निर्माण झाली होती.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्याकडून रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांना आपल्या भावना सरकारकडे तात्काळ कळविण्यात येतील, मराठा आंदोलनातील तरुणांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यात येतील, तसेच जातीयवादी अधिकाऱ्यांची बदली करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लवकरात लवकर वैधता प्रमाणपत्र दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे तब्बल ९ तासानंतर या आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.