बीडमध्ये मल्टिस्टेटविरोधात ४ हजार ठेवीदार रस्त्यावर
आमदार खासदार हाय... हाय.. म्हणत आंदोलकांचा संताप
बीडमध्ये मल्टिस्टेटविरोधात ४ हजार ठेवीदार रस्त्यावर
-आमदार खासदार हाय… हाय.. म्हणत आंदोलकांचा संताप
बीड : ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम, राजस्थानी यासह अन्य मल्टिस्टेट मध्ये मागील आठ महिन्यांपासून लाखो खातेदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. हे पैसे मिळावेत यासाठी ठेवीदार वारंवार शासन, प्रशासन दरबारी चकरा मारत आहेत. मात्र याकडे जिल्ह्यातील पालकमंत्र्यांसह आमदार, खासदार दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या ४ हजार ठेवीदारांनी सोमवारी रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला. आमदार खासदार हाय… हाय…, सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय…. सर्व संचालकांची मालमत्ता जप्त करा…, आमच्या ठेवी परत करा… अशा घोषणा देत शिवाजी महाराज पुतळा येथून मोर्चा काढत साठे चौकात ठिय्या आंदोलन केले.
अर्थसंकल्पातून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा
जिल्ह्यातील मल्टिस्टेट च्या विरोधात शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्चाने वाहतूक तब्बल ३ तास ठप्प होती. याशिवाय जिजाऊ, साईराम, राजस्थानी, शुभ कल्याण, मातोश्री, लक्ष्मीमाता, मराठवाडा अर्बन आदी बँकांत लाखो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने सोमवारी आक्रमक झालेले चार हजार ठेवीदार रस्त्यावर उतरले.
आंदोलनादरम्यान थोडा पाऊस झाला, मात्र ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. साठे चौका दुपारी दीड तास त ठिय्या आंदोलन, पालकमंत्र्यांसह आमदार, खासदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिने मुदत – मनोज जरांगे यांच्या मागणीला यश
नांदेडकडे जाणारा गुटखा आष्टीत जप्त
बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची लागवड -पावसामुळे पिकाची गुणवत्ता सरस
साठे चौकात ठिय्या मांडून बसलेल्या ठेवीदारांचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी आले होते. मात्र प्रशासनातील वरिष्ठ आधिकाºयांनी यावे, अशी मागणी करण्यात आली.
ठेवीदारांना कधी ठेवी मिळतील याचे ठोस आश्वासन द्यावे तेव्हाच आम्ही आंदोलनातून उठू, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यामुळे तहसीलदार परत गेले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ठेवी मिळण्यासाठी प्रशासन योग्य ती कार्यवाही करत असल्याचे आश्वासन देऊन त्यांनी ठेवीदारांचे निवेदन स्वीकारले.
उबाळेंच्या नेतृत्वाखाली दंडुका मोर्चा
सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली दंडुका मोर्चा, दणका मोर्चा आणि यासह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले त्या वेळी पाचशेच्या आत ठेवीदार आंदोलनात सहभागी होत होते. सोमवारच्याही आंदोलनाला एक हजार ठेवीदार येतील, असा अंदाज पोलिस प्रशासनाला होता.
ज्ञानराधात १७९० कोटी अडकले
ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये १ लाख ६५ हजार ८७२ ठेवीदारांचे तब्बल १७९० कोटी १ लाख ३७ हजार रुपये अडकले आहेत.
शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत -लक्ष्मण हाके यांची पवारांवर टीका
जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिने मुदत – मनोज जरांगे यांच्या मागणीला यश