Jammu Kashmir: कुपवाडाच्या लोलाबमधील चकमकीत 1 दहशतवादी ठार

0

Jammu Kashmir: कुपवाडाच्या लोलाबमधील चकमकीत १ दहशतवादी ठार

कुपवाडा : Jammu Kashmirच्या कुपवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या या माहितीनुसार कुपवाडा जिल्ह्यातील कोवुत भागात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. तर लष्कराचा एक जवानही जखमी झाला आहे. सध्या परिसरात सुरक्षा दलांचे आॅपरेशन सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात खोºयातील विविध भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दररोज चकमक होत आहे. मात्र, एलओसीसह खोºयात तैनात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.

अलिगड मुस्लिम विद्यापीठात गोळीबार -दोन कर्मचारी जखमी
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्ज प्रकरणी ‘उच्च’ दिलासा

Jammu Kashmirच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी या भागात दहशतवादविरोधी कारवाया सुरू केल्या. आज पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि दहशतवादी आमनेसामने आले आहेत. यानंतर लोलाब परिसरात चकमक सुरू झाली. काश्मीर पोलिस विभागाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, सुरक्षा दलांना कुपवाडा येथील लोलाब येथील त्रिमुखा टॉपजवळ दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली.

नोकरीची संधी : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये पदभरती
शिवछत्रपतींच्या नाटकासाठी तुरुंगात जायला तयार – मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांना

लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

पूंछमध्ये घुसखोरीचा प्रयत्न मंगळवारी उधळला गेला. पाकिस्तानी दहशतवादी अनेकदा खोºयात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात पण सीमेवर तैनात भारतीय जवान त्यांच्या नापाक कारवाया पूर्ण होऊ देत नाहीत. काल म्हणजेच मंगळवारीही दोन दहशतवाद्यांनी पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न केला पण सुरक्षा दलांनी त्यांना हाणून पाडले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.