पैठण बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच मोकळा कांदा बाजार

-३ हजार भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान

0

पैठण बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच मोकळा कांदा बाजार

-३ हजार भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान

पैठण : पैठण बाजार समितीने पहिल्यांदाच मोकळा कांदा बाजार सुरू केल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे पंचवीस ते तीस रुपये वाचत असून यामुळे कांद्याला ३ हजार १०० रु भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर थोडेसे समाधान दिसत आहे. जिल्ह्यातील इतर बाजार समितीच्या कांद्याच्या लिलावच्या तुलनेत पैठणच्या मोकळा कांदा बाजारात २८०० ते ३१०० रुपये भाव मिळाला असल्याचे बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी सांगितले.

पैठण बाजार समितीने मोकळा कांदा ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने गोणी खरेदी करणे, मजुरांकडून त्या भरून घेणे, पुन्हा मजुरां मार्फत त्या वाहनात टाकणे, कमीत कमी मनुष्यबळाच्या भरवशावर ही प्रक्रिया आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे मत सचिन मोरे शेतकरी कातपूर, रामचंद्र काळे शेतकरी वडवाळी यांनी नोंदवले आहे. पैठणमध्ये मोकळा कांदा लिलाव सुरू झाल्याने व कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने संभाजीनगरसह नगर जिल्ह्यातील कांदा देखील येथे विक्रीसाठी येत आहे. मोकळा कांदामध्ये प्रतवारी एकसामान असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून जास्तीजास्त भाव मिळतो, असे सांगितले जात आहे.

काद्याला सरासरी २८८० रुपये

पैठण बाजार समितीने मोकळा कांदा बाजार सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी लिलावसाठी २० वाहने आली. यात उन्हाळा कांदा किमान २५२५ ते ३१०० तर सरासरी २८८० रुपये भाव मिळाला. पहिल्यांदाच मोकळा कांदा बाजार सुरू केल्याने गोणी मागे लागणारा खर्च २५ रुपयांपर्यंत वाचला आहे.

कांद्याचा दर्जा कळतो

पैठण बाजार समिती मध्ये पहिल्यांदाच मोकळा कांदा बाजार सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची प्रति क्विंटल मागे बचत होत आहे. शिवाय गोणी मधील कांदा एक गोणी खराब असली तरीही भाव कमी मिळत होता. मोकळा कांदा विक्रीसाठी येत असल्याने कांद्याचा दर्जा कळतो, असे बाजार समितीचे सभापती राजुनाना भुमरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.