एनपीएस कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

0

एनपीएस कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर, (वा.) : ‘राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस) कार्यशाळा’ जिल्हा कोषागार कार्यालयाकडून महिला तंत्रज्ञान महाविद्यालयातील सभागृहात पार पडली. कार्यशाळेस जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी, लेखा कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. मुंबईच्या ‘प्रोटेन’चे सहायक व्यवस्थापक सूर्यकांत तरे, लातूर जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील, अप्पर कोषागार अधिकारी संतोष धुमाळे, नागेश बुद्धीवंत यांनी योजनेंतर्गत गुंतवणूक बदल, खाते पासवर्ड रिसेट, अंतिम प्रदान, अंशतः प्रदान करणे आदींबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सचिन गोंड यांनी केले. आभार सुरज साळुंखे यांनी मानले.

काय आहे या कार्यशाळेत?

नोकरीच्या सेवाकार्यातून निवृत्त होण्यास १ ते १.५ वर्ष शिल्लक असलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वनिवृत्ती समुपदेशन या कार्यशाळेत सहभागी केले जाते. निवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांच्या मनोवृत्तीत बदल करणे आवश्यक असते. यासाठी निवृत्ती वेतनधारकांच्या विभागातर्फे या समुपदेशन कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.