कमला हॅरिस यांच्यासाठी तामिळनाडूतील थुलसेंद्रपुरम गावात बॅनरबाजी

-गावाच्या वेशीवर असलेल्या मंदिराबाहेर हॅरिस यांचा फोटो असलेला बॅनर

0

कमला हॅरिस यांच्यासाठी तामिळनाडूतील थुलसेंद्रपुरम गावात बॅनरबाजी

-गावाच्या वेशीवर असलेल्या मंदिराबाहेर कमला हॅरिस यांचा फोटो असलेला बॅनर

नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार होणार हे निश्चित मानले जात आहे. यामुळे कमला हॅरिस यांचे माहेर असलेले तामिळनाडूतील थुलसेंद्रपुरम गावात त्यांच्या समर्थनार्थकांनी पोस्टर्सबाजी करून गजबजून सोडले आहे. गावाच्या वेशीवर असलेल्या मंदिराबाहेर कमला हॅरिस यांचा फोटो असलेला बॅनर आहे.
बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर या मंदिरात पूजा सुरू झाली, जी अमेरिकेत मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहे. हॅरिस यांचे आजोबा पीव्ही गोपालन हे याच गावचे रहिवासी होते. यावेळी मंदिराचे मुख्य पुजारी एम. नटराजन यांनी सूर्योदयानंतर काही तासांनी पूजा केली, हिंदू देवता धर्मसंस्थेला मिठाई आणि तांदळाची खीर अर्पण केली. यावेळी ते ६१ वर्षीय पुजारी म्हणाले की, आम्ही त्यांच्यासाठी यापूवीर्ही पूजा केली होती आणि त्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्या. आमच्या देवाच्या आशीवार्दाने त्या राष्ट्राध्यक्षही होतील.
गावात राहणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्याने एएफपीला सांगितले की, हॅरिस यांचे नाव त्यांच्याशी जोडल्यामुळे त्यांच्या गावाला खूप फायदा झाला आहे. गावातील जलाशयाच्या दुरुस्तीसाठी स्थानिक बँकेने एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. हे केवळ हॅरिस यांच्यामुळेच घडू शकले. तसेच मंदिराच्या एका भिंतीवर देणगीदारांची यादी लावलेली आहे. त्यावर हॅरिस यांचेही नाव लिहिले आहे. मात्र त्या या गावात कधीच आल्या नाहीत. पुजारी यांनी सांगितले की, गेल्या वेळी त्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्या तेव्हा आम्ही जल्लोष केला होता. त्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर हा जल्लोष आणखी मोठा होईल. आम्हाला आशा आहे की राष्ट्राध्यक्ष या नात्याने त्या गावाला नक्कीच भेट देतील.
Leave A Reply

Your email address will not be published.