घरकुलासाठी ५ ब्रास वाळू देण्याच्या योजनेचा एकच लाभार्थी
– वाळू उपलब्ध मात्र जनजागृती शुन्य
पैठण : सर्वांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने दारिद्र रेषेखालील व आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थींसाठी आवास योजना अमलात आणली आहे. या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी प्रती ५ ब्रास वाळू देण्याचा निर्णय शासनाने घेऊन तीन महिने झाले मात्र पैठण मध्ये आजपर्यंत केवळ एकाच लाभार्थाला मोफत वाळूचा लाभ मिळाला आहे, या निर्णयानुसार तहसील प्रशासनाने पाहिजे तेवढी वाळू उपलब्ध करुन ठेवली आहे. मात्र या योजनेची म्हणावी तशी जनजागृती शुन्य झाली असल्याने लाभार्थी वंचित राहत आहेत.
जायकवाडी धरणात साडेतीन टक्क्यांहून अधिक वाढ
परिवर्तन आघाडीच्या नेतृत्वात २८८ उमेदवार देणार
जायकवाडीतील प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाची वैधता
टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्यात क्रांती येईल
पंचायत समितीच्या अधिकारी यांनी या संदर्भात जनजागृती केली नसल्याने पैठणमध्ये मोफत वाळू घरकुलासाठी उपलब्ध झाली नसल्याने अनेकांचे घरकुल अपूर्ण राहिले आहेत. तालुक्यातील मंजूर घरकुलाच्या लाभार्थींना तात्काळ माहिती देऊन मोफत वाळू उपलब्ध करुन देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य रेवण कर्डिले यांनी केली आहे.
प्रत्येक व्यक्तीला हक्काचा निवारा मिळावा, याकरिता शासनाकडून विविध आवास योजना कार्यान्वित केली आहे. घराचे बांधकाम करताना लाभार्थींना वाळूअभावी घराच्या बांधकामास विलंब लागत होता त्यामुळे पाच ब्रास प्रति घरकुलासाठी वाळू उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी पंचायत समितीत लाभार्थींनी अर्ज करावे. मोफत पाच ब्रास वाळू देऊ रेतीचे दर आवाक्याबाहेर आहेत. पुरेशी वाळू उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थींचे बांधकाम रखडते, तर काहींनी वाळूला पर्याय म्हणून क्रशचा वापर करत आहेत. यात पाच ब्रास वाळू विकत घ्यायची म्हणजे तीस हजार रुपये लागतात. त्यामुळे अनेकांनी या वाळूकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
जनजागृती करणे गरजेचे
मागील वर्षी घरकुले मंजूर झाली. घरबांधकामासाठी वाळू मिळेनाशी झाली आहे. मोफत वाळूची माहिती मिळेना, त्यामुळे क्रशने बांधकाम केले जात आहे. मोफत वाळूबाबत प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिलेली नाही. शासनाने योजनेची जनजागृती करणे गरजेचे आहे, असे एक घरकुल लाभार्थी आनंद हिवराळे म्हणाले.