मनपा क्षेत्रातील पाणी पुरवठ्याबाबात आढावा बैठक
– पाणीपुरवठ्याच्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा
छत्रपती संभाजीनगर : मनपा क्षेत्रातील पाणी पुरवठा प्रकल्पाबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगरला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा देता यावा यासाठी करण्यात येणाºया कामांचा आढावा घेण्यात आला. सदर बैठकीत पाणीपुरवठ्याच्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्यांना सूचना केल्या. या बैठकीला पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती नसल्याने याची चर्चा आता रंगली आहे.
बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद
सोने आणि चांदीच्या किमतीत जागतिक बाजारपेठेत वाढ होत असताना भारतात किमती का घसरल्या, खरेदीसाठी हि खरी वेळ आहे काय?
पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर वसलेली नसून ती शेतकरी, कष्टकरी कामगारांच्याच्या तळहातावर वसलेली आहे: शिवशाहीर : आण्णाभाऊ साठे
मागील अनेक वर्षांपासून शहराचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी अद्याप शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा झालेला नाही. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र जो पर्यंत नागरिकांच्या घरातील नळांना पाणी येत नाही, तो पर्यंत कोणत्याच राजकीय पक्षावर आता नागरिकांचा विश्वास नाही. त्यामुळे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर पुढाकार घेतला असल्याचे दिसत आहे.