वंचितच्या प्रकाश आंबेडकरांसाठी भाजप आमदाराने पाटोद्यात वाजविला ढोल!

कोणाच्या फायद्यासाठी गळ्यात बांधले जातेय ढोलचे लोढणे?

0

वंचितच्या प्रकाश आंबेडकरांसाठी भाजप आमदाराने पाटोद्यात वाजविला ढोल!

कोणाच्या फायद्यासाठी गळ्यात बांधले जातेय ढोलचे लोढणे?

पाटोदा : ओबीसी आरक्षण बचाव संवाद यात्रा, मंगळवार रोजी पाटोदा शहरात आली असता यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागतासाठी भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह भाजप समर्थकांनी स्वागत करत ढोल वाजवला आहे. यामुळे या आरक्षण बचाव यात्रा भाजप प्रणित असल्याची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात असले तरी ते कितपत खरे हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. याशिवाय कोणाच्या फायद्यासाठी गळ्यात बांधले जातेय ढोलचे लोढणे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव याचा नगर जिल्ह्यातील चौंडीकडे जाताना पाटोदा शहरात दाखल झाले होते. यावेळी भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी त्यांचे ढोल वाजवून स्वागत केले. धोंडे हे सध्या आष्टी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून संभाव्य उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. त्यात त्यांनी केलेले ढोलवादन हे पक्षासाठी दबावतंत्र आहे की आणखी कशासाठी? याची चर्चा सुरू झाली आहे. धोंडे यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे मतदारसंघातून जात असल्याचे कळल्यावर आपण त्यांच्या स्वागतासाठी थांबलो होतो, असे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले असले तरी भाजपचा माजी आमदार ढोल वाजवित असेल तर का आणि कशासाठी हे प्रश्न शेवटी अनुत्तरित राहत असल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे सध्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दौºयावर आहेत. ते लातूर येथून पाटोदामार्गे पुढे चौंडी येथे निघाले होते. त्याचवेळी पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात काही कार्यकर्ते आंबेडकरांच्या स्वागतासाठी थांबले होते. यावेळी पाऊस सुरू होता तरीही माजी आमदार धोंडे यांनी स्वागतासाठी आणला गेलेला ढोल गळ्यात बांधून ढोल वाजवला. त्यानंतर प्रकाश आंबेडकर हे त्या ठिकाणी दाखल झाले यावेळी त्यांनी धोंडे यांच्याशी झालेल्या संवादावेळी छत्रपती संभाजीनगर येथे होणाºया समारोप कार्यक्रमाला येण्याची विनंती केली.

आमदारांना ढोल वेड कशासाठी

भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागतासाठी ढोल बदडल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी आमदार सुरेश धस यांनीही आपल्या गळ्यात ढोलचे लोढणे आडकून ते बदडण्याचे काम केल्याची आज धोंडे यांनी पुनरावृत्ती केल्याने आष्टी पादोटा मतदार संघातील भाजपच्या नेत्यांना ढोल वाजवण्याचा नाद जडला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.