मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या पाठीत लाथ घाला – मनोज जरांगे पाटील आक्रमक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक

0

आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या पाठीत लाथ घाला – मनोज जरांगे पाटील आक्रमक

– मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक

जालना : सरकारच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने आज शनिवार रोजी जरांगे यांची आंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी आलेल्या शिष्टमंडळाला स्पष्ट शब्दात आपले मत मांडले, या चर्चेदरम्यान जरांगे पाटील यांनी पुन्हा सत्ताधारी आमदारांना धारेवर धरले. या शिष्टमंडळात आमदार नारायण कुचे, आ. राणा जगजितसिंह राणा, आमदार राजेंद्र राऊत यांचा समावेश होता. यानंतर बोतलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, असे ज्या नेत्यांना वाटतंय ना, त्यांच्या पाठित लाथ घालून हाकलून लावा,
यावेळी जरांगे म्हणाले की, कुणबी ही मराठ्यांची उपजात आहे. त्यामुळे आम्हाला मराठा आरक्षण दिलंच पाहिजे. नाही तर कुणबी मराठ्यांची उपजात नसल्याचे सिद्ध करा. मग मंडल आयोगही चॅलेंज होईल, असं सांगतानाच ज्यांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येत नाही असं वाटतंय, त्यांच्या पिछाड्यावर लाथ मारून त्यांना हाकला ना, तशा नेत्यांना तुम्ही उघड का करत नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी सगेसोयऱ्याच्या मुद्द्यावर माझी पीएचडी झाली आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही वकील माज्यासमोर बसवा आम्हाला कसं आरक्षण मिळत नाही ते सांगा असे म्हणाले.

व्यवसायाच्या आधारावर सगळ्यांना आरक्षण दिलं आहे. मराठा समाजाचा व्यवसाय शेती आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले त्यानंतर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांनी म्हटले की, जे निव्वळ मराठा आहेत त्यांना ओबीसीत घेताना सरकारला अडचण होत आहे. त्यावर सरकारमधील लोकच सापडलेल्या नोंदी रद्द करा म्हणत आहेत. मग आम्हाला राग येणार नाही का? असा सवाल जरांगे यांनी केला. ५७ लाख नोंदी रद्द करा म्हणतात, अशी मागणी कॅबिनेटमध्ये करण्यात आली. म्हणजे मराठ्यांविषयी तुमची भावना किती वाईट आहे हे दिसून येत असल्याचे जरांगे म्हणाले त्यामुळे आलेल्या शिष्टमंडळाला मनोज जरांगे यांची मनधरणी कशी करावी असा प्रश्न पडल्याचे दिसले.

आता जे तुम्ही आक्षेप घेतले आहे ते आधी तुम्ही सरकारला लिहून दिले आहे का? असा सवाल राणा जगजीत सिंह यांनी केला. त्यावर मनोज जरांगे यांनी हो असे उत्तर दिले. सरकारला लिहून दिले आहे. पण सुमित भांगे हे मुद्दामहून जीआरमध्ये काड्या करत आहेत. सोयऱ्याला जात प्रमाणपत्र देताना गृह चौकशी करण्याचा सरकारचा मुद्दा योग्य आहे. सगेसोयरे याचाच सरकारला मेळ नाही. आमच्यात आणि कुणबींमध्ये लग्नाच्या सोयरीक होतात, याची नोंद घ्या. मराठा आरक्षण देताना आमच्या व्याख्येनुसार आरक्षण द्या. आमची व्याख्या सरकारने घेतली पण त्यातून काही शब्द वगळले, अशी नाराजी मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.

आम्हाला राजकारण करायचं नाही

सरकारने सगेसोयरेची केलेली व्याख्या आम्हाला मान्य नाही. आम्ही सांगितलेले शब्द जर व्याख्येत घेतले तर बरं होईल. सरकार आणि सगे सोयरे याच्यावर माझी पीएचडी झालीय, असं सांगतानाच आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करतोय असा आरोप होऊ नये म्हणून आम्हाला राजकारण करायचं नाही, आमच्या मागण्या पूर्ण करा, असे जरांगे म्हणाले.

जरागेंचा पश्चिम महाराष्ट्र दौरा

मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. हा दौरा ७ ऑगस्टपासून सोलापूर येथून सुरू होणार असून यामध्ये शांतता रॅली काढण्यात येणार आहेत. या दौऱ्याचा समारोप नाशिकमध्ये होणार आहे.

नेमका दौरा कसा

मनोज जरांगे पाटील हे ७ ऑगस्ट रोजी सोलापूर येथे शांतता रॅली काढणार असून त्यांचा मुक्काम सोलापुरात असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ८ ऑगस्ट रोजी सांगली, ९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर, १० ऑगस्ट रोजी सातारा जिल्हा, ११ ऑगस्ट रोजी पुणे, १२ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर आणि १३ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात या शांतता यात्रेचा समारोप होणार आहे.

सांगावा आलाय पाटलांचा

मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यात नियोजन बैठका झाल्या असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच सोशल मीडियावर सांगावा आलाय पाटलांचा, पुढील मोहिमेचा… अशा पद्धतीने मेसेज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फिरू लागले आहेत. या दौऱ्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.