मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याकडे आमदार शिरसटांनी फिरवली पाट

शिरसाटांच्या अनुपस्थितीमुळे नव्या चर्चेला उधाण

0

मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याकडे आमदार शिरसटांनी फिरवली पाट

– शिरसाटांच्या अनुपस्थितीमुळे नव्या चर्चेला उधाण

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात आमदार संजय शिरसाट यांची अनुपस्थिती ही चर्चेचा विषय ठरली आहे. शिरसाट हे पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते. मात्र पालकमंत्री पद सत्तारांना मिळाल्यामुळे शिरसाट यांनी शिंदेंच्या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. या कार्यक्रमात ते आमदार शिरसाट हे गैरहजर असल्याने राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला देखील शिरसाट यांची उपस्थिती नसल्याने शिंदे सेनेतील नाराजी नाट्या समोर आले आहे.

शिवसेना फुटीपासून आमदार संजय शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट म्हणाले होते की, मंत्रिमंडळाचा विस्तार हा झाला पाहिजे. अन्यथा अनेक आमदार नाराज होतील. पण मंत्रिमंडळाचा विस्तार करायला काय हरकत आहे? मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असं होणार नाही तर मंत्रिमंडळाचा विस्तार हा होईल असे शिरसाट यांनी म्हटले होते.

संजय शिरसाट यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येताच भुमरे यांनी, पालकमंत्री होण्यासाठी आधी मंत्री व्हावे लागेल, असा टोला लगावला होता. यादरम्यान काळात मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची नावे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदासाठी चर्चेत होती. मात्र, आपल्या दोघात तिसरा नको, म्हणून भुमरे,अब्दुल सत्तार हे एकत्र आले, असे मानले जाते. याबाबत अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

संदिपान भुमरे खासदार झाल्यानंतर पालकमंत्रिपदासाठी भाजपचे अतुल सावे आणि शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांची नावे चर्चेत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोडचे आमदार व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री केले. खासदार भुमरे आणि सत्तार हे एकत्र आल्यामुळे शिरसाट यांना पालकमंत्रिपदापासून दूर राहावे लागले. दीड-दोन महिन्यांत विधानसभेची आचारसंहिता लागू होणार आहे.

शिरसाट आणि भुमरे यांच्यात मतभेद

पालकमंत्रिपदावरून आधीच भुमरे-शिरसाट यांच्यात कोल्ड वॉर सुरू होते. संदीपान भुमरे खासदार झाल्यानंतर पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, यावर चर्चाही झाली. पण भुमरेंनी पालकमंत्रिपदासाठी अब्दुल सत्तार यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली होती, अशी चर्चाही सुरू होती. तेव्हापासून संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे यांच्यात मतभेद वाढल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.