नवीन बसस्थानकाचे काम संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल

- मागील ९ महिन्यांपासून बसस्थानकाचे काम सुरू

0

नवीन बसस्थानकाचे काम संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल

– मागील ९ महिन्यांपासून बसस्थानकाचे काम सुरू

बीड : प्रतिनिधी
शहरातील नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे काम करण्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये याठिकाणची जुनी इमारत पाडून त्याच्या बाजूला तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले. या बसस्थानकात मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात पाणी साचत आहे. मागील ९ महिन्यांपासून बसस्थानकाचे काम सुरू आहे. मात्र अद्याप ५० टक्केही काम पूर्ण न झाल्याने या कामाला आणखी ५ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होणार आहेत.

या नवीन इमारतीचे काम करण्यासाठी तात्पुरते पत्र्याचे शेड मारून बसस्थानक उभारण्यात आल असून हे बसस्थानक अत्यंत कमी जागेत असल्याने बस थांबण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यातच बसस्थानक परिसरात दगडगोटे, मातीमिश्रित मुरूम या परिसरात टाकला आहे. त्यामुळे या बसस्थानकामध्ये कोणती बस कोठे लागणार याचे नियोजन ९ महिन्यांनंतरही न झाल्याने प्रवाशाचे हाल सुरू आहेत.

प्रवाशांना या बसस्थानकात चिखलात उभे राहावे लागत असून वयोवृद्ध आलेल्या प्रत्येक बसकडे धाव घेताना चिखलमय परिसराचा सामना करावा लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर सुर असल्याचे सांगितले जात असले तरी मात्र मागील ९ महिन्यांपासून मात्र प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहेत.

मुदतीच्या आत काम पुर्ण करू

वर्क ऑर्डर नुसार हे काम २०२५ पर्यंत पूर्ण करायचे आहे. मात्र मुदतीच्या आत आम्ही डिसेंबर पर्यंतच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या २४ तास काम सुरू आहे, असे उपअभियंता अविनाश मंजूळे यांनी सांगितले.

मुरूम टाकल्याने चिखल

बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. यरमुळे हा चिखल सिमेंट रस्त्यावर येतो. दुभाजकात मातीमिश्रित मुरूम टाकल्याने चिखल साचत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.