बाळासाहेब ही इतर राजकारण्यांसारखेच निघाले…
बाळासाहेब ही इतर राजकारण्यांसारखेच निघाले…
077698 86666
बाळासाहेबांकडून ही अपेक्षा नव्हती.. मराठा-ओबीसी वादामुळे अनेक जिल्ह्यातील सामाजिक वातावरण अत्यंत दूषित झालंय, अगदी जिवलग मित्रांच्या मैत्रीवर, एकाच गावात किंवा एकाच कॉलनीत राहणाऱ्यांच्या संबंधांवर याचा अत्यंत वाईट परिणाम होतोय.. हा वाद सुरू झाल्यापासून मनात सतत धाक-धूक राहते की हे सगळं प्रकरण वाईट टोकावर जायला नको.. कारण मराठा आणि ओबीसी हे दोन गट पडले की दोघे सोबत राहणार नाहीतच आणि यापैकी एक गट तरी निश्चितच मनुवाद्यांकडे आपली मते वळवणार..
सतत वाटत राहतं हा वाद थांबविण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे.. कुणीतरी ह्या मराठा आणि ओबीसींमध्ये समन्वय घडवून आणला पाहिजे.. असे कोण लोक आहेत? असा विचार केला तर त्यात संभाजी ब्रिगेड चे प्रवीणदादा गायकवाड, संभाजीराजे छत्रपती, ज्ञानेश वाकुडकर, ऍड.असीम सरोदे, छगन भुजबळ, पंकजा किंवा धनंजय मुंढे आणि महत्वाचे म्हणजे ऍड.बाळासाहेब (प्रकाश)आंबेडकर.. ह्या सर्व लोकांनी राजकारण बाजूला ठेऊन या मराठा-ओबीसींमध्ये समन्वय घडवून आणावा आणि आधीसारखं निकोप वातावरण पुन्हा तयार करावं असं वाटत राहायचं..
पण बाळासाहेबांचं वाशीमचं भाषण ऐकलं आणि त्यांच्याबद्दल जे वेगळेपण मनात होतं ते गळून पडलं.. ऍड.प्रकाश आंबेडकरांच्या अनेक भूमिका पटल्या नाहीत पण एक आशा मनात होती की बहुजन समाजाला जेव्हा गरज पडेल त्यावेळी नक्कीच बाळासाहेबांचं नेतृत्व कामी येईल.. पण हेसुद्धा इतर राजकारण्यांसारखेच निघाले..
वाशीम ला दिलेल्या भाषणात ऍड.प्रकाश आंबेडकर म्हणतात “ओबीसींनो खूणगाठ बांधा की आम्ही ओबीसीलाच मतदान देणार, हे करत असताना कुणबी-मराठ्यांना मतदान करणार नाही”..
जरांगे पाटील यांनी पुस्तकांपेक्षा माणसं जास्त वाचली : इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे
आमदार राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करीत जरांगेंचा निशाणा
जरांगे फॅक्टरमुळे पाटोद्याच्या नेतृत्वाला यंदा संधी मिळण्याची अपेक्षा
काय बोलावे ह्यावर? हे विधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला तरी धरून आहे का? की घटनेच्या विपरीत आहे? असं कोणत्याही जातीबद्दल आपण कसं काय म्हणू शकतो की ह्या जातीच्या लोकांना मतदान करू नका? अहो आधीच देशात हिंदू-मुस्लिम, ओबीसी-मराठा, आदिवासी-धनगर वाद टोकाला गेलेत त्यात आता ओबीसी-कुणबी मराठा वाद वाढवून आणि बहुजणांमध्ये आणखी फूट पाडून काय साध्य होईल साहेब? उद्या मुस्लिम हिंदूंना मतदान करणार नाहीत, मराठे ओबीसीला मतदान करणार नाहीत, ओबीसी एस सी ला मतदान करणार नाही, एस.सी. हे एस.टी. ला मतदान करणार नाहीत आणि प्रत्येकच जातीवाला म्हणेल की आम्ही दुसऱ्या जातीला मतदान करणार नाही.. हा वाद कुठल्या टोकाला जाऊ शकतो कृपया हा तरी विचार करा.. आपण सगळे परस्परांवरच अवलंबून आहोत, सगळे बहुजन एकत्र आल्याशिवाय आजच्या काळात प्रचंड सशक्त झालेल्या मनुवादाशी कसें लढू शकणार आहोत? हे मी तुम्हाला सांगण्याइतका मोठा नाही..
सर्व बहुजणांना एकत्र आणण्याची, हे वाद मिटविण्याची आणि हे दूषित वातावरण निवळण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तिमत्वांनीच अशी वक्तव्ये केली तर कसं चालायचं?
भडकविणारे मराठा-ओबीसी नेते एकमेकांवर शेलक्या शब्दात तोंडसुख घेतात, आपापल्या समाजाला परस्परांविरोधात चिथावण्या देतात कारण त्यांचा सामाजिक अभ्यास नाही, त्यांना सामाजिक सलोख्याचे काही घेणे देणे नाही आणि मनुवादx बहुजनवाद हा लढाच त्यांना माहीत नाही किंवा कळलेला नाही पण आपल्याकडून अशी मनुवादाला खतपाणी देण्याची अपेक्षा कधीच नव्हती साहेब, आपण कधीतरी असं बोलाल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं.. आपणही इतर राजकारण्यांसारखेच निघाले ही खंत मनात कायम राहील..