कालसर्प पुजेसाठी गेलेला इंजिनिअर पाय घसरून गोदावरीत वाहुन गेला

- हळहळ व्यक्त करीत अनेकांकडून केली जातेय त्यांच्या शिक्षणावर शंका

0

कालसर्प पुजेसाठी गेलेला इंजिनिअर पाय घसरून गोदावरीत वाहुन गेला

– हळहळ व्यक्त करीत अनेकांकडून केली जातेय त्यांच्या शिक्षणावर शंका

नाशिक : येथील गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यात कालसर्प धार्मिक विधीसाठी रामकुंड येथे गेलेल्या इंजिनिअर यग्नेश पवार (वय २९, रा. ओझर) यांचा पाय घसरल्याने ते नदीच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजता घडली. पवार हे महावितरणमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत असून ते सध्या भुसावळ येथे होते. पेशाने इंजिनिअर असलेले पवार हे नीलकंठेश्वर मंदिर येथे काल सर्प योग पूजेनिमित्त आले होते. मात्र गोदावरी नदीत पूजन करताना पाय घसरून नदीत पडून वाहून गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्या इंजिनिअर असण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गोदावरीच्या पाणी पातळीत रविवारी (दि. ४) पहाटेपासूनच वाढ झाल्याचे दिसत होते. याठिकाणी सकाळी आठ वाजेपासून कालसर्प धार्मिक विधींसाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. नाशिककर पूरस्थिती पाहण्यासाठी गर्दी जमल्याने पोलिसांकडून याठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. यामध्ये पंचवटी पोलिसांसह वाहतूक पोलिसांच्या पथकांनी गोदावरी नदीपात्राला वेढा घालून कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेतली होती. मात्र येथील नीलकंठेश्वर मंदिरात कालसर्प धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर रामकुंड परिसरात विधी करीत असताना महावितरणमध्ये इंजिनिअर पदावर कार्यरत असलेल्या पवार यांचा नदीपात्रात तोल गेल्याने ते वाहून गेले.

कालसर्प पुजा करण्यासाठी आलेले इंजिनिअर पवार हे नदीपात्रातील पुरात वाहून गेल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलासह बचाव पथकाला पाचारण शोधमोहीम सुरू केली. ही शोधमोहीम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेनंतर गोदावरी नदी तीरावरील सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.