संभाजीनगरात ई पॉस मशीनची प्रेत यात्रा काढून निषेध
- अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवाधारक महासंघ आक्रमक
संभाजीनगरात ई पॉस मशीनची प्रेत यात्रा काढून निषेध
– अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवाधारक महासंघ आक्रमक
छत्रपती संभाजीनगर : ई पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन असते याशिवाय त्याला नेटही मिळत नाही. यामुळे online नोंद होत नसल्याने रेशन वाटप करता येत नाही. त्यामुळे रेशन दुकानदार व ग्राहक यांच्यात वाद होऊ लागल्याने याकडे लक्ष वेधुन घेण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवाधारक महासंघाच्या नेतृत्वात रेशनदुकानदारांनी सोमवारी दुपारी बारा ते दीड वाजेच्या सुमारास निदर्शने आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय, पुरवठा विभागापर्यंत ई पॉस मशीनची प्रेत यात्रा काढून निषेध नोंदवण्यात आला.
मी छत्रपतींचे हिंदुत्व चालवतो, भाजपचे जातीच्या विरोधातले हिंदुत्व नाही – मनोज जरांगेे पाटील
13 वर्षीय अरविंद खोपे खुनाचा सीबीआय मार्फत तपास करून दोषींना कडक शासन करा
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
बंद मशीन जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे स्पूर्द करण्यापूर्वी बंद पडत असलेल्या २२५ ई पॉस मशीनला श्रद्धांजली अर्पण २०० मीटरपर्यंत प्रेत यात्रा काढली होती. यावेळी जुलै महिन्यातील ३० टक्के पडून असलेले रेशन ऑफ लाइन वाटप करण्याचे निर्देश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र ही समस्या तातडीने सोडवली नाहीतर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
दररोज रेशनदुकानापुढे लाखो लाभार्थी रांगे लावतात. पण त्यांना खाली हात परत जावे लागत आहे. गैरसमजुतीतून रेशनधारक व रेशन दुकानदार यांच्यात वाद होऊ लागले आहेत. यामुळे रेशन दुकानदारही त्रस्त झाले आहेत. याकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन समस्या तातडीने सोडवावी, यासाठी आठ दिवसांपूर्वी रेशनदुकानदारांनी जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले होते.
गोरगरीबांना अन्नधान्य वाटप करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. यामुळे लाभार्थ्यांना थेट लाभ मिळावा. गैरप्रकार थांबावा, ही त्या मागणची नेक भूमिका आहे. यासाठी अद्यावत ई पॉस मशीन रेशन दुकानदारांना वितरित करण्यात आल्या आहेत. त्यावर लाभार्थ्यांचा थंब घेतल्याशिवाय अन्नधान्य, वस्तुंचे वितरण करता येत नाही. मात्र मशीनच चालत नसल्याने हि प्रक्रिया ठप्प पडली आहे.
मशीन संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवल्या
याप्रकरणाची दखल न घेतल्यामुळे ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय, पुरवठा विभागापर्यंत ई पॉस मशीनची प्रेत यात्रा काढून निषेध नोंदवण्यात आला. तसेच बंद दोनशे पंचवीस मशीन संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवल्या आहेत. पारदर्शक व्यवहारासाठी ई पॉस मशीन चांगल्या द्याव्यात, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डिगंबर पाटील यांनी बोलताना केली.