चीनमधील तरुणाईकडून सद्य स्थितीचा विरोध

-शांघाय-बीजिंग या मेगासिटीला तरूणांची सोडचिठ्ठी

0

चीनमधील तरुणाईकडून सद्य स्थितीचा विरोध

-शांघाय-बीजिंग या मेगासिटीला तरूणांची सोडचिठ्ठी

नवी दिल्ली : चीनमधील तरुणाई सध्याच्या स्थितीचा विरोध करताना दिसत आहे. यामध्ये बहुतांश युवा कमी उत्पन्न, मात्र चांगल्या आयुष्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. या तरूणांनी आपल्या करिअरच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. येथील शांघाय-बीजिंग या मेगासिटी ही शहरे कायमची सोडताना दिसत आहेत. हे तरूण आता सूटा-बुटात कार्यालयात जाण्याऐवजी ते कॅज्युअल्समध्ये जात असल्याचे समोर आले आहे.

चीनचे काही तरुण वास्तवात रूपांतरीत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शिक्षण-नोकरीचा तणाव, नोकरीच्या शोधाचा तणाव किंवा घरातील तणाव कमी करण्यासाठी ते स्वत: किलबिलाट करत पक्ष्यांप्रमाणे रेलिंगवर लटकत किंवा उड्या मारण्याचे व्हिडिओ बनवत आहेत. चीनमध्ये आपले भविष्य सुरक्षित दिसत नाही असे या तरूणांकडून सांगितले जात आहे. आपला तणाव कमी करण्यासाठी हे तरूण उड्या मारण्याचे काम करत आहेत. या धावपळीच्या आयुष्यातून दूर जात आपण माणूस नाहीत याची अनुभूती हे तरूण घेऊ इच्छित आहेत.

यामुळे तरुणाईत शिक्षण आणि करिअरची आवड संपल्याने पक्षी होऊन व्हिडिओ बनवणारा अर्थशास्त्राचा २० वर्षीय चिनी विद्यार्थी वँग वेहान म्हणाला, चीनच्या तरुणाईत हा ट्रेंड स्वातंत्र्याच्या ओढीचा निष्कर्ष आहे. चीनचा समाज, राजकारण आणि अर्थशास्त्राचे तज्ज्ञ आणि जर्मनीस्थित मॅक्सलँक इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँथ्रोपोलॉजीचे संचालक जियांग बियाओ म्हणाले, चीनमध्ये आजच्या युवा पिढीला लहानपणापासूनच हे सांगितले जाते की, तुम्ही जर खूप शिकलात, कष्ट घेतले तर तुमचे भविष्य सोनेरी आहे. ही पिढी जेव्हा मोठी होते तेव्हा त्यांचे स्वप्न भंगते. यामुळे ते तणावात राहतात. प्रा. बियाओ म्हणाले, चीनच्या तरुणाईच्या आशा खूप जास्त होत्या. त्यामुळे आता त्यांना वाटू लागले की, असेच सगळे व्हायचे होते तर आपण आयुष्याचा आनंद का घेतला नाही.

चीनमध्ये बेरोजगारीत दरवर्षी वाढ

चीनची अर्थव्यवस्था कमकुवत असल्याने बेरोजगारी दरवर्षी वाढत आहे. देशातील १.२० कोटी युवा गेल्या वर्षी पदवीधर झाले. हे २००४ च्या तुलनेत चौपट जास्त झाले आहेत. त्यापैकी अनेक बेरोजगार आहेत तर काहींना आपल्या आवडीचे करिअर मिळाले नाही. उच्च शिक्षण नोकरीची हमी देत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.