बीड जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार
-कानडीघाट येथील शेतकरी पवनचक्की कंपन्यांच्या विरोधात आक्रमक
बीड जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार
-कानडीघाट येथील शेतकरी पवनचक्की कंपन्यांच्या विरोधात आक्रमक
बीड : जिल्ह्यातील बालाघाटावर पवनचक्की कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर पेव फुटले असुन त्यात पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. या विरोधात कानडीघाट येथील शेतकरी आक्रमक झाले असुन त्यांनी गुरूवार रोजी टॉवरची तार ओढण्याचे काम बंद पाडले. या शेतकऱ्यांनी आमच्या शेतातील टॉवर उभारणी कामाचा तसेच उभ्या पिकातुन तार ओढणीचे काम केल्यास पिकांचे नुकसान होणार असुन अगोदर भरपाई द्या त्यानंतरच तार ओढण्याचे काम करा, अशी मागणी करीत आक्रमक भूमिका घेतली आहे.
यावेळी पवनचक्की कंपन्यांनी सुरूवातीला उर्मटपणाची भाषा करीत दंडेलशाही पद्धतीने काम रेटण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरी आक्रमक झाले. यावेळी पवनचक्की कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर गावात मोठ्या प्रमाणावर पोलीसांचा फौजफाटा जमा झाल्याने गावामध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण झाले. मात्र अखेर पवनचक्की कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी काम न करताच निघून गेले.
दूध भेसळ रोखण्यासाठी नमुने तपासणी
परळी विधानसभेची जागा शिवसेना लढणार
शासनाकडे बोट न दाखवता आपण आपल्या वयाएवढी झाडे लावू
जिल्ह्यातील गोलंग्री, कानडीघाट,सुलतानपुर या गावांमध्ये ओ २ कंपन्यांचे टॉवर उभारणे आणि तार ओढण्याचे काम सुरू असून शासकीय परीपत्रकाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यासाठी ३५ मीटर रूंदीचा नियम असताना जुने शासकीय परीपत्रके दाखवून १६ मीटर प्रमाणे नुकसान भरपाई घ्या म्हणतात तसेच याठिकाणी उभारलेल्या २६ टावर उभारण्यात आले असुन प्रत्येकाला नुकसान भरपाईचा मोबदला वेगवेगळा दिलेला आहे. गंभीर बाब म्हणजे या शेतकऱ्यांकडे करारनाम्याची प्रत नाही दिशाभूल करून सह्या घेतलेल्या आहेत. यापूर्वी मे महिन्यात ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टावरचे काम झाले आहे त्यांना अद्याप मोबदला देण्यात आलेला नाही. या कंपन्या शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत असुन पोलिस प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी न उभे राहता कंपन्यांच्या बाजुने उभे रहत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे श्रीकांत कवडे यांनी सांगितले.
उन्हाळ्यात टावर उभारणीचे काम पूर्ण झालेले असताना तेव्हा तार ओढण्याचे काम न करता पवनचक्की कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी आमच्या उभ्या पीकातुन विद्युत तार ओढण्यासाठी आलेले असुन सध्या आमच्या उभ्या पिकातुन तार ओढण्यासाठी आलेले असुन आमच्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा पिक काढल्यावर तार ओढण्याचे काम करण्यात यावे अशी आमची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र कंपन्यांचे अधिकारी हे दंडेलशाहीचा वापर करून पोलिस फौजफाटा बोलावून दमबाजी करत तार ओढण्याचा प्रयत्न करीत अयल्याने ग्रामस्थांनी तो हाणुन पाडला. आम्हाला नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय काम करू न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याने तार ओढण्यासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना रिकाम्या पावली परत फिरावे लागल्याचे विठ्ठल झोडगे यांनी सांगितले.
पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक
शेतकरी सुभाष रामभाऊ झोडगे रा. कानडीघाट यांना ६ लाख रूपयांचा धनादेश दि.१० जुन २०२४ रोजी दिला होता. सुभाष यांचे वडील रामभाऊ यांना बार्शी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन उपचारासाठी पैसे काढण्यासाठी धनादेश बँकेत जमा केला असता खात्यावर पैसे नसल्याने वटला नाही. यापुर्वीही दोन वेळा अशा घटना घडलेल्या असल्याने कंपनीच्या आर्थिक व्यवहाराविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.