दूध भेसळ रोखण्यासाठी नमुने तपासणी
-संबंधितांवर कारवाई करण्यासाठी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल
जालना : जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी विविध दूध व दुग्धजन्य पदार्थांचे ४४ नमुने घेण्यात येऊन प्रयोगशाळेत तपासणी केली. यात ३८ नमुने प्रमाणित आले असून ३ नमुने कमी दर्जाचे आले. यामुळे संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची माहिती दूध भेसळ समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी दिली.
परळी विधानसभेची जागा शिवसेना लढणार
शासनाकडे बोट न दाखवता आपण आपल्या वयाएवढी झाडे लावू
जिल्हा परिषदेच्या 98 शाळा 10 वर्षांपासून ईमारत विरहीत
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत दुधातील भेसळ रोखण्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणारे सर्व परवानाधारक, वितरक, दुकान, स्टॉल आदींना संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी भेट देऊन भेसळ आढळल्यास कार्यवाहीचे आदेश मेत्रेवार यांनी दिले. दुधातील भेसळीमुळे दूध उत्पादक शेतकºयांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. या दूध भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. यामुळे जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने दूध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी शासन निर्णयान्वये शासनाने जिल्हास्तरावर समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकाºयाना घोषीत केले आहे.
भेसळ ओळखा
जन्मतःच लहान मुलांना दुधाची आवश्यकता असते, पाहुणचार म्हणून दुधाचा चहा प्रत्येक ठिकाणी घेतला जातो, व्यायाम करणारे, खेळाडू, लहान शिशु ते अत्यंत वयस्कर वृध्द हे दुध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ जीवनावश्यक अन्न म्हणून घेतात. दुध हे आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी मानले जाते आणि जर दुधातच भेसळ असेल तर मोठ मोठे आजार जडतात. तर दुधातील भेसळ म्हणजे काय हे शोधणे आवश्यक आहे. खालील कांही टिप्स दिलेले आहेत.
दुध ग्राहकांना देण्याआधी दुधात बाहेरील घटक मिसळणे म्हणजेच भेसळ होय.
दुधात भेसळ म्हणून पाणी, युरिया (लिटमस पेपर जर निळे झाले तर उरिया आहे), डिटर्जंट (दुध जोरात हलविल्यास फेस आले तर डिटर्जंट आहे.), स्टार्च (थोडे आयोडीन टाकल्यास हलका गुलाबी रंग दिसला तर स्टार्च आहे.)