शासनाकडे बोट न दाखवता आपण आपल्या वयाएवढी झाडे लावू

- सयाजी शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

0

शासनाकडे बोट न दाखवता आपण आपल्या वयाएवढी झाडे लावू

– सयाजी शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अंबाजोगाई : मराठवाड्यात झाडांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने येथे वषार्नुवर्षे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. हा धोका टाळण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे बोट न दाखवता आपण निसर्गासाठी काय योगदान देऊ याचा विचार केला पाहिजे. चला सावली पेरूया, आपल्या वयाएवढी झाडे लावू या, असे आवाहन मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. ते शहरात काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीत बोलत होते.

शहरातील प्रियदर्शिनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण, वृक्षदिंडी व वृक्ष संवाद व बीज संस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सयाजी शिंदे त्यांनी वृक्ष व पर्यावरण जपण्यासाठीची सर्वांना शपथ दिली. रोपे कशी लावावीत याचे स्वत: प्रात्यक्षिक करून दाखवत प्रत्येकाने दिलेल्या बियांचे रोपण करून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वाढलेले हेच झाड आपणास आपल्या आईप्रमाणेच फळांच्या, फुलांच्या व सावलीच्या रूपाने प्रेम देते, त्यामुळे त्यांना जपा, असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमास राजकिशोर मोदी, सिनेलेखक अरविंद जगताप, कृषिमित्र शिवराम घोडके, दगडू लोमटे, राजपाल लोमटे आदींची उपस्थिती होती. झाडे लावा झाडे जगवा, एक मूल एक वृक्ष, रोप वाढतील प्रदूषण टाळतील, झाडे आहेत जीवनाचे मित्र, झाडे जगवा जीवन सजवा अशा विविध घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. वृक्षदिंडीमध्ये वारकरी सहभागी झाले होते. पर्यावरणाविषयीचे अभंग गात होते. या वृक्षदिंडीचा समारोप वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयात झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.