संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या १८ जागा लढविणार
प्रदेशाध्यक्ष अँड. मनोज आखरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या १८ जागा लढविणार
– प्रदेशाध्यक्ष अँड. मनोज आखरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
हिंगोली : राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीत संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या राज्यात १८ जागा महाविकास आघाडीतून लढविणार असुन यात हिंगोली विधानसभेचा प्रामुख्याने समावेश असून ही जागा आपण स्वतः लढविणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रमुख मनोज आखरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ज्ञानराधा बँकेच्या विभागीय कार्यालयावर ईडीचा छापा
मुख्यमंत्री यांच्या कृतज्ञता सोहळ्याची आंबेडकरी समाजाकडून घोषणा
प्रहारच्या आक्रोश मोर्चामुळे ट्राफीक जॅम झाल्याने शहराला मनस्ताप
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड. मनोज आखरे यांच्यासह सुधीर देशमुख , महेश राखोंडे आदींची उपस्थीती होती. यावेळी बोलताना आखरे म्हणाले की, संभाजी ब्रिगेडची महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा पक्षासोबत युती आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळत माहविकास आघाडीच्या मोठया संख्येने जागा निवडून आल्या, त्यामुळे. तिन्ही घटक पक्षांतील प्रमूख नेत्यांची बैठीदरम्यान हा विषय चर्चिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येणा-या सोमवारी मुंबई येथे बैठक होणार आहे. यावेळी जागेची निश्चिती होणार आहे, संभाजी ब्रिगेडने १८ जागांची मागणी केली यामध्ये हिंगोली, नांदेड उत्तर, वर्धा, चिखली यासह इतरही विधानसभेचा समावेश आहे. मात्र हिंगोली विधासभेच्या जागेसाठी संभाजी ब्रिगेड यांची आग्रही भूमिका असून जागा सोडविणार आणि मनोज आखरे स्वतः निवडणुक रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती आखरे यांनी दिली.