भोकरदन तालुक्यात रिमझिम पाऊस
-डेग्युंच्या रुग्ण संख्येत वाढ
भोकरदन : तालुक्यात मागील दोन महिन्यापासुन रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे परिसरात थंडी, ताप, सर्दी, खोकला तसेच डेग्युंच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे अस्थामाचे रुग्णही वाढत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणाºया रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे गावातील ग्रामपंचायत व आरोग्य यांनी कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे.
वातावरणात झालेला बदल आणि संततधार पाऊस यामुळे त्याचा परिणाम थेट जनआरोग्यावर झाल्याचे दिसत आहे. यामुळे सर्दी,ताप,खोकला,यासा रखे आजार बळावत असुन प्रत्येक घरामध्ये हा त्रास घरातील एकातरी व्यक्तीला सुरू आहे. त्यामुळे भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाची संख्या वाढत आहे. यामुळे सध्या शासकीय रूग्णालयासह खासगी दवाखान्यांमुळे रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
शिक्षक समन्वय समितीच्या वतीने पंचायतसमोर आंदोलन
अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश
रेल्वेच्या धडकेने मेंढपाळासह 22 मेंढ्या मृत्यू
डेग्युंच्या रुग्ण संख्येत वाढ: तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या ८ गावात प्राथमिक आरोग्य केंद्र तर ४१ गावात आरोग्य उपकेंद्र केंद्राची उभारणी केली आहे. शासकीय रुग्णालयातील ओपीडीचा आकडा दीडशे पर्यंत पोहचला आहे. यामध्ये बरेच वैद्यकीय अधिकाºयांसह इतर आरोग्य कर्मचारी आपल्या कामात हालगर्जीपणा करीत असल्यामुळे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना दवाखान्यात गेटवर बसुन तास न तास आरोग्य अधिकाºयांची वाट पहावी लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
तालुक्यात गरीबांना मोफत व वेळेवर आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाने तब्बल आठ गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली आहे. या ठिकाणी रुग्णावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधीकारी देखील नेमून दिलेले आहे. मात्र यातील बहुतांश ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कायम गायबच राहत आहेत. याबाबत अधिकाºयांना विचारणा केली केली तर ते उलट रुग्णांना धमकवत असल्याचा प्रकार समोर आला असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.
नागरिकांनी काळजी घ्यावी
डेग्युंच्या रुग्ण संख्येत वाढ: मागील आठ दिवसात दवाखान्यात पाच डेंग्युंचे रुग्ण आढळून आले आहेत. या बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. रुग्णांची संख्या देखील दुपटीने वाढली आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे डॉ.गोपाल बावस्कर यांनी सांगितले.