तहसील कार्यालयात दिव्यांगांची हेळसांड

- दिव्यांग आयुक्तांच्या सुचनांकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष

0

तहसील कार्यालयात दिव्यांगांची हेळसांड

– दिव्यांग आयुक्तांच्या सुचनांकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष

पाटोदा : शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयात दिव्यांगासाठी रॅम्प, लिफ्ट ची सुविधा असावी असा शासन नियम असतानाही पाटोदा तहसील कार्यालयाने या नियमाला केराची टोपली दाखवली आहे. या तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा नसल्याने मागील सात वर्षांपासून दिव्यांगाना तिसºया मजल्यावर जाण्यासाठी ५४ पायºया सरपटत चढून जावे लागत असल्याने त्यांची हेळसांड होत आहे. संदर्भात दिव्यांग आयुक्तांनी दिलेल्या सुचनांकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

या पाटोदा तहसिल कार्यालयाची इमारत ही निजामकालीन होती ती पाडून या नव्या इमारतीसाठी इकोट्यावधी रुपयाच्या निधीचा चुरडा करुन नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतू इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करताना इमारत क्षेत्रात दिव्यांगासाठी रॅम्प, लिफ्टच्या सुविधेचा कोणताही विचार कंत्राटदार, अधिकाºयांनी केला नाही. यामध्ये तहसिलदांचे कक्ष इमारतीच्या तिसºया मजल्यावर आहे. त्यांची स्वाक्षरी, निवेदन देण्यासाठी वर जाताना दिव्यांगांना ५४ पायºया चढताना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. याशिवाय या दिव्यांग बांधवांना चढताना आणि उतरतना मोठी कसरत करावी लागत असल्याने अपघात होण्याचीही शक्यता आहे.

दिव्यांगांचे कामकाज तळमजल्यावर

दिव्यांग आयुक्तांच्या सुचना नुसार दिव्यांगांचे कामकाज इमारतीच्या तळमजल्यावरील बैठक कक्षात केले जाणार आहे. सबंधीत विभागाला सुचना देखील दिल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आला आहे, असे पाटोद्याचे तहसिलदार दत्तात्रय निलावाड यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.