भोकरदन तालुक्यातील रस्त्याची दयनीय अवस्था
-रस्त्याच्या दुरूस्तीसाठी लोखंडे हीचे लोकप्रतिनिधींना पत्र
भोकरदन : तालुक्यातील बरंजळा लोखंडे या परिसरातील शेवगा वाडी येथील रस्त्याची दनयीय अवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलमय रस्त्यातून शाळा गाठावी लागत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कल्याणी लोखंडे हिने आमदार, खासदार, पालकमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. येथील शाळेत जरी शाळेत चांगले शिक्षण असले तरी शाळेत जातांना मोठी कसरत करीत चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्त करावी, अशी मागणी कल्याणी लोखंडे हीने पत्राव्दारे केली आहे. मात्र यावर लोकप्रतिनिधी काय निर्णय घेतात याकडे पहावे लागणार आहे.
बीड जिल्ह्यातील ९८ शाळा इमारत नसल्याने उघड्यावरच
मराठवाड्यात सात महिन्यांत 511 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
आसामच्या उच्च न्यायालयाकडून आसारामला मिळाला दिलासा
तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील शेवगा वाडी म्हणून असलेल्या वस्तीवरील विध्यार्थ्यांना रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने चिखलमय रस्त्यातून शाळा गाठावी लागते. यामधील काही विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत तर काही खाजगी शाळेत शिक्षण घेत आहे. यावेळी त्यांना शाळा जाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. त्यात पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्याने त्यांना चिखलातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे हा रस्ता तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी कल्याणी लोखंडे हीने पत्राद्वारे केली आहे.
या गावातील नागरिकांना दवाखान्यात जाण्यासाठी बैलगाडीतून रस्ता गाठावा लागतो. हा रस्ता बरंजळा लोखंडे ते गारखेडा-फत्तेपूर मार्गे भोकरदनला जोडणारा जुना पाणंद रस्ता आहे. मात्र रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने विध्यार्थ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. याबाबत विद्याथीर्नी कल्याणी भगवान लोखंडे हिने खासदार डॉ. कल्याण काळे, पालकमंत्री अतुल सावे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना रस्त्याची व्यवस्था करुन देण्याबाबत विनंती पत्र लिहिले आहे.
आमचेही जगणे मान्य करा
गेल्या सात वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असून या शाळेमध्ये खुप छान शिक्षण मिळाले. परंतु ते शिक्षण घेण्यासाठी आम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागला. शाळेत जायला रस्ते व्यवस्थित नाही, पाणंद रस्त्याने जात असतांना रोज चिखलातून गेल्याने पायाला जखमा होतात. नेहमीच चिखलातून पायी प्रवास करावा लागत असल्याने आम्ही अनेकदा आजारी पडतो. त्यामुळे आमच्या व्यथा, समस्या जाणून घ्या अन आमचेही जगणे मान्य करा असे कल्याणी लोखंडे या मुलीने आपल्या पत्रात म्हटले आहे.