मराठवाड्यात सात महिन्यांत 511 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
-दोन वर्षांत दोन हजार ११० शेतकऱ्यांनी संपवले जीवन
मराठवाड्यात सात महिन्यांत 511 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
-दोन वर्षांत दोन हजार 110 शेतकऱ्यांनी संपवले जीवन
छत्रपती संभाजीनगर : दररोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. तरीही शेतकरी आत्महत्या सत्र कायम असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. मागील सात महिन्यांत मराठवाड्यातील ५११ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. याशिवाय गेल्या दोन वर्षांत विभागात दोन हजार ११० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शासन या आत्महत्या रोखण्यास सफसेल अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.
मराठवाड्या दुष्काळ, पाणी टंचाईचे संकट आ वासून उभे आहे. याठिकाणी असलेल्या एकूण क्षेत्रापैकी येथील सुमारे ८० टक्के क्षेत्र क्षेत्र कोरडवाहू आहे. याठिाकणी कोणतीही सिंचनाची सोय नाही. या विभागातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या उत्पादनात घट होत असल्याने हे शेतकरी नैराश्यात जात आहेत.
आसामच्या उच्च न्यायालयाकडून आसारामला मिळाला दिलासा
अनधिकृत जाहिरातींमुळे रजिस्ट्रारकडून मनपा अधिकाऱ्यांची कानउघाडणी
कंपन्यांच्या गुंतवणूकीमुळे मराठवाड्यात आर्थिक क्रांती घडेल
शेतमालाचे पडलेले भाव, अवकाळी पाऊस तरी कधी लांबणीवर गेलेला पाऊस याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. त्यांनी पेरणीसाठी घेतलेल्या बॅकेंच्या कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत जातो त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मरणाशिवाय दुसरा पर्यान दिसत नसल्याने ते हा मार्ग निवडताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारने यावर काहीतरी उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र सरकार उद्योगपती आणि व्यावसायीकांचे कर्ज माफ करून या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना दिसत आहे. मागित सात महिन्यात तर जानेवारी महिन्यात ८४, फेब्रुवारीत ६२, मार्चमध्ये ६७, एप्रिल महिन्यात ५२, मे मध्ये ८१, जूनमध्ये ८६ तर जुलै महिन्यात विभागातील ७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या
यामध्ये जानेवारी ते जुलै २०१४ या सात महिन्यांतच मराठवाड्यातील ५११ शेतकºयांनी आपले जिवन संपवले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक म्हणजे ११५ घटना घडल्या आहेत.
जिल्हानिहाय आत्महत्येच्या घटना
१ जानेवारी ते जुलै २०२४ अखेर
छत्रपती संभाजीनगर —– ८०
जालना —– ४२
परभणी —– ३९
हिंगोली —– १८
नांदेड —– ८४
बीड —– ११५
लातूर —– ४५
धाराशीव —– ८८
एकूण —– ५११
मागील पाच वर्षातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या
वर्ष संख्या
२०१९ ९३७
२०२० ७७३
२०२१ ८८७
२०२२ १,०२२
२०२३ १,०८८
एकूण —– ११,५१८