लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपयात बुधवार पेठ बंद होणार आहे का? – दिपक केदार
ऑल इंडिया पॅथर सेनेने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांचा राज्यसरकारला सवाल
लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपयात बुधवार पेठ बंद होणार आहे का?
– ऑल इंडिया पॅथर सेनेने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांचा राज्यसरकारला सवाल
बीड : राज्य सरकार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केल्यानंतर त्यात असणा-या अटी आणि शर्तीसाठी सरकारने अनेकवेळा खाडोखड केली. यानंतर आता त्या योजनेच्या नावावर आपली व्होट बँक पक्की करण्याचा घाट जरी राज्य सरकारकडून घातला जात असला तरी ही योजना किती दिवस सुरू राहील आणि ही योजना महिलांसाठी खरच फलदायी ठरेल की नाही हे सध्यातरी सांगता येत नाही. मात्र या योजनेसंदर्भात, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणा-या १५०० रुपयात बुधवार पेठ बंद होणार आहे का? असा रोखठोक सवाल ऑल इंडिया पॅथर सेनेने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केला आहे.
केदार यांनी आपल्या इंस्टाग्राम वरून हा सवाल करताना म्हटले की, पोटासाठी देह विकला जातो, शरीर विक्रीचा बाजार भरला जातो. कुणाला वाटत आपलं शरीर विकावं अन जगावं. लाडली बहीणच ना ती आपली… असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपयात बुधवार पेठ बंद होणार आहे का?
दिपक केदार यांची इंस्टाग्राम पोस्ट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात जाहितबाजी सुरू असून दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधील आमदार रवी राणा मात्र जर निवडणूकीत महिलांनी मत दिली नाहीत तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळालेले पैसे परत घेणार असा इशारा महिलांना देताना दिसले. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातून आपली व्होट बँक पक्की करण्याचा तर विचार केला नाही, असा प्रश्न सध्या लोकांकडून उपस्थित केला जात आहे. तसाच प्रश्न ऑल इंडिया पॅथर सेनेने दिपक केदार विचारताना म्हणतात की, १५०० रुपयात बुधवार पेठ बंद होणार आहे का? तिला रोजगार द्या, तिला आत्मसन्मान द्या, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना केले आहे.