पोलिसांनी नितेश राणेच्या थोबाडीत मारली पाहिजे होती – इम्तियाज जलील

-माजी खासदार इम्तियाज जलील यांची राणेंवर टीका

0

पोलिसांनी नितेश राणेच्या थोबाडीत मारली पाहिजे होती – इम्तियाज जलील

-माजी खासदार इम्तियाज जलील यांची राणेंवर टीका

छत्रपती संभाजीनगर : राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? नीतेश राणेंपेक्षाही घाण मी बोलू शकतो. नीतेश राणे हा शेंबड पोरगं त्याला महत्त्व देऊ नका. चांगला पोलिस अधिकारी असता तर त्याला मारलं असतं. तो सकाळी उठला की हिंदू हिंदू करतो. त्याला पोलिसांनी नितेश राणेच्या थोबाडीत मारली पाहिजे होती, अशी खोचक टीका माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. भाजप आमदार नीतेश राणे यांनी राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात ते बोलत होते.

सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चादरम्यान मंगळवारी नितेश राणे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे नितेश राणे यांचा सर्वत्र निषेध केला जात आहे.

यावेळी नितेश राणे म्हणाले होते की, मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो. पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे राणे यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ होताना दिसत आहे. त्यात नितेश राणे हे विदर्भाच्या दौऱ्यावर असताना पोलिस बॉईजकडून त्यांच्या ताफयाला काळे झेंडे दाखवून निषेध केला.

कारवाईची मागणी करणार

जो अधिकारी पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच विरोधकांच्या इशाऱ्यावर जे अधिकारी काम करणार असेल तर अशा अधिकाऱ्यांनी आपली वर्दी वाचवून दाखवावी, असा इशारा देत ते म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांमुळे गृह खाते बदनाम होत आहे, त्यांची तक्रार गृहमंत्र्यांकडे करुन कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वक्तव्याशी सहमत असल्याचे विधान

या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात असला तरी नितेश राणे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचे समर्थन केले. मी माझ्या विधानाशी सहमत असल्याचे सांगताना ते म्हणाले की, पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, अथवा न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे माझे कर्तव्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.