भोकरदनमध्ये डॉ. दिलीपसिंह राजपूतांचा कोवळ्या कळ्यांचा कत्तलखाना

-पैशाच्या हव्यासापोटी मुलगी असल्याचे सांगून गर्भपात

0

भोकरदनमध्ये डॉ. दिलीपसिंह राजपूतांचा कोवळ्या कळ्यांचा कत्तलखाना

-पैशाच्या हव्यासापोटी मुलगी असल्याचे सांगून गर्भपात

जालना : घरातील जेष्ठांना घरात मुलगाच हवा असा हव्यास असतो. त्यामुळे अनेकजण गर्भलिंगनिदान करतात. त्यामुळे भोकरदन शहरात पैशाच्या हव्यासापोटी डॉ. दिलीपसिंह राजपूत याने आलेले गिऱ्हाईक फक्त सोनोग्राफी करून, परत जाऊ द्यायचे नाही. म्हणून मुलाचा गर्भ असला तरी मुलगी असल्याचे सांगून गर्भपात करून एकप्रकारे कोवळ्या कळ्यांचा कत्तलखाना सुरू केल्याचे समारे आले आहे. त्याने दवाखान्यात लावलेल्या सीसीटीव्हीमध्येही गर्भपात सुरू असल्याचा प्रकार कैद झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

डॉ. दिलीपसिंह राजपूत याच्या रुग्णालयावर ६ जुलै रोजी अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपातप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने ही कारवाई केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या कारवाईनंतर यातील मुख्य आरोपी डॉ. दिलीपसिंह राजपूत आणि त्याचा सासरा डॉ. के. एन. राजपूत दोघेही फरार आहेत. गेल्या महिनाभरात पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना, अनेक खळबळजनक प्रकार समोर येत आहेत. यात मुलाचा गर्भ असला तरीही डॉ. राजपूत हे गर्भपात करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. म्हणून मिरवणाऱ्या दिलीपसिंह राजपूत यांच्याकडे कोणतीही अधिकृत पदवी तसेच परवानगी नसताना तो सोनोग्राफी करायचा. यामधून जास्तीत जास्त पैसा मिळविण्यासाठी तो गर्भपात करीत असल्याची माहिती समोर येत आहे. एका गर्भपातासाठी तो २५ ते ३५ हजार रुपये उकळायचा. यावेळी मात्र तो मुलीचा गर्भ असेल तर तो गर्भ नातेवाइकांच्या हाती द्यायचा. अन्यथा मुलाचा गर्भ असेल तर त्या गर्भाची विल्हेवाट तो स्वत:च लावायचा, असे रुग्णालयातील काही महिलांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.