सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करा – भोऱ्याची मुख्यमंत्री शिंदेकडे मागणी

सरकारने बारीक लाडक लेकरू योजना आणावी भोऱ्याची मुख्यमंत्री शिंदेकडे मागणी

0

सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करा – भोऱ्याची मुख्यमंत्री शिंदेकडे मागणी

सरकारने बारीक लाडक लेकरू योजना आणावी भोऱ्याची मुख्यमंत्री शिंदेकडे मागणी

जालना : सुट्टी असली की बारकाल्या पोरांना घरची काम सांगतात, स्वातंत्र नावाचा गलत इस्तेमाल करतात मोठी माणसं. सरकारने सगळ्यांना पगार सुरू केला हे बंद करा अशाने आळशी पिढी तयार होईल, मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील असा सल्ला भोऱ्या वजीर याने सरकारला दिला आहे. या कार्तिक वजीर ने स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद शाळेत भाषण केले. यावेळी त्यांनी सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली.

अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या कार्तिक वजीर म्हणाला की, मोठाल्या पोरांना सरकार ने पगार सुरू केलाय आम्ही बारक्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलं आम्हाला सुद्धा खर्चा पाण्याला पैसे लागतात असं म्हणत कार्तिक वजीर याने सरकारकडे मुलांना सरसकट पगार सुरू करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना त्याने सरकारच्या योजनांवरून भविष्यातील धोका देखील सांगितला आहे. आम्हाला पगार.. मोठाल्या लोकांना पगार.. लेकीला पगार.. सुनेला पगार.. मग सगळ्यांनाच पगार.. काम करायची गरजच नाही. फुकटचं बसून खायचं, बंद करा हे सगळं .. अशानं आळशी पिढी तयार होईल, असाही तो म्हणाला.

पोरांनी सरकारचं काय घोडं मारलं; भोऱ्याचं भाषण

सरकारने लाडक लेकरू योजना आणावी

इंग्रज कडू होते जुलमी होते पण आपल्या क्रांतिकारी लोकांनी त्यांना पाणी पाजलं. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण आपल्यासारख्या बारक्या पोरांना अजून खरंच स्वातंत्र्य आहे का? सरकारने बारीक-सारीक लाडका लेकरू योजना आणावी आणि सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा अशी मागणी करत शहाणे व्हा कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही, असा सल्ला भोºयाने दिला.

बारक्या पोरांना स्वातंत्र्य आहे का?

बारक्या पोरांना अजून खरंच स्वातंत्र्य आहे का असा प्रश्न त्याने थेट स्वातंत्र्यदिनी उपस्थित केला. यावेळी तो म्हणाला की, सुट्टी असली की घरचे काम, रानातले काम, स्वातंत्र्य नावाला काही गोष्ट आहे की नाही. आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले मोठाले माणसं असं म्हणत त्याने लहान मुलांच्या स्वातंत्र्याबद्दल देखील सवाल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.