उद्धव ठाकरेंमुळे विरोधकांचे जहाज बुडेल – आमदार संजय शिरसाट
- आमदार संजय शिरसाट यांची महाविकास आघाडीवर टीका
उद्धव ठाकरेंमुळे विरोधकांचे जहाज बुडेल – आमदार संजय शिरसाट
– आमदार संजय शिरसाट यांची महाविकास आघाडीवर टीका
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर टाकण्याचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा सुरू आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे हे विरोधकांचे प्रचारप्रमुख असतील तर त्यांचे जहाज बुडालेच म्हणून समजा असा टोला हाणला.
विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आली असतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी काँग्रेसपुढे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी देण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सांगितली जात आहे. यासंदर्भात संजय शिरसाट यांनी टीका केली.
विधानसभा निवडणुकीत निष्ठावंतांना उमेदवारी दिली तरच मागे राहू
महाविकास आघाडीत कुरघोडीच्या राजकारणास सुरूवात
पाकिस्तानमध्ये मंकीपॉक्सच्या रूग्णसंख्येत वाढ – जगात 571 मृत्यू
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रचाराची धुरा सोपवली असेल तर मग त्यांचे जहाज बुडालेच म्हणून समजा. त्यांच्या विभागनिहाय ४ सभा होतील आणि प्रचार संपेल. काँग्रेस व शरद पवार त्यांच्याकडे धुरा वगैरे काहीही देणार नाहीत. विशेष म्हणजे ठाकरेंची स्वत:चीही अशी एखादी जबाबदारी घेण्याची मानसिकता नाही. उद्धव ठाकरे साहेब आहेत की संजय राऊत आहेत, असे संजय शिरसाट म्हणाले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेविषयी शिरसाट म्हणाले की, आज लाडक्या बहिणींच्या घरात दिवाळी साजरी होत आहे. महायुती सरकारने ज्या काही घोषणा केल्या, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. माता-भगिनींच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होतात, तेव्हा त्याचा आनंद त्यांनाच माहिती असतो.
शिंदे जे बोलतात ते करतात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्यांच्या घरात आज दिवाळी आहे. तुम्हा-आम्हांसारख्या ३ हजारांचे महत्त्व कळणार नाही. एकनाथ शिंदे जे बोलतात ते करतात, असे शिरसाट म्हणाले.