जरांगे फॅक्टर रोखण्यासाठी लाडकी बहीण योजना जन्माला घातली

ऑल इंडिया पॅथर सेनेने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांचा सरकारच्या योजनेवर घणाघात

0

जरांगे फॅक्टर रोखण्यासाठी लाडकी बहीण योजना जन्माला घातली

– ऑल इंडिया पॅथर सेनेने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांचा सरकारच्या योजनेवर घणाघात

बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण मिळावे यासाठी ते मागील वर्षापासून आंदोलन करीत आहेत. या लढ्यात त्यांच्यासोबत मराठा बौद्ध आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं असल्याने महायुती सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यापढे जणू हात टेकले आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना मतांची कडकी भासू लागल्याने बहीण लाडकी नावाने योजना आणली असली तरी ही योजना देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची देणं आहे, असं म्हटलं जातं आहे. त्यामुळे ऑल इंडिया पॅथर सेनेने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार म्हणाले की, जरांगे फॅक्टर आणि आंदोलनं रोखण्यासाठी लाडकी बहीण योजना जन्माला घालून थेट अकाऊंट मध्ये पैसे पाठवले जात आहेत, असे म्हणावे लागेल.

राज्य सरकारच्या तिघाडी सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केल्यानंतर त्या योजनेच्या नावात बदल करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्पर केल्याने सरकार मध्ये संवादाचा अभाव असल्याचे उघड झाले. या योजनेचे निकष आणि अटी वारंवार बदलल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यात तर काही फाॅर्म भरण्यासाठी गेलेल्या लाडक्या बहिणींची आर्थिक लूट केल्याचा घटना अनेक ठिकाणी उघडकीस आल्या होत्या. त्यात आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करून भले ही सरकारने आपली मतांची कडकी भरून काढण्याचा प्रयत्न केला असला तरी तो कितपत यशस्वी होईल हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. पण याबद्दल पॅंथरचे दिपक केदार म्हणतात की, मनोज जरांगे फॅक्टर रोखण्यासाठी थेट अकाऊंट मध्ये पैसे पाठवले जात आहेत. हे आंदोलन रोखण्याचे पैसेच म्हणावे लागतील.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खात्यावर पैसे मिळाल्यावर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला मात्र सरकार पाहिजे तेवढा प्रतिसाद देताना सध्यातरी महिला दिसत नाहीत. यासंदर्भात दिपक केदार यांनी आवाहन केले की, मराठा महिलांनी हे पैसे घ्यावेत पण आपला लढा विसरू नये, असे म्हणत त्यांनी हे सगळे लढ्याला हरवण्यासाठी आहे, राजकीय स्कीम ओळखण्याचे आवाहन केले आहे.

क्रॅक करणे काळाची गरज

लाडकी बहीण योजना विरोधकांनी सहज घेऊ नये. ३ हजार रुपये खात्यात आल्यामुळे जी चर्चा सुरु झाली ते मोठं चॅलेंज आहे. काहीजण आरक्षण मुद्द्याला कवटाळून बसलेत पण ते चुकत आहेत. त्यांना वाटत आरक्षण हाच मुद्धा नेरेटिव्ह राहील.
या विधानसभेला ही लाडकी बहीण योजना परिणामकारक ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला क्रॅक करणे काळाची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.